Share

महाराष्ट्रातील ‘या’ केंद्रीय मंत्र्याचा मुलगा महाविकास आघाडीला मतदान करणार; राजकारणात खळबळ

सध्या राज्यसभेची सहावी जागा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत सहा जागा असताना भाजपने ३, शिवसेनेने २ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक-एक उमेदवार उतरवला आहे. या निवडणूकीत सहाव्या जागेसाठी भाजप-शिवसेना यांच्यात चुरस पाहायला भेटणार आहे. (raosaheb danve sons on rajysabha election)

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपलाच विजय होणार असा दावा करताना दिसून येत आहे. त्यामुळे सहावी जागा कोण जिंकणार हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अशात शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मोठा दावा केला आहे, ज्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे हे राज्यसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीला मतदान करतील, असे दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या दाव्याची राज्यभरात चर्चा रंगली आहे.

आम्हाला जर राज्यसभेसाठी एखादं मत कमी पडलं तर आम्ही आमच्या भोकरदनमधील एक आमदार आहेत त्यांना सांगू. रावसाहेब दानवेंचे चिरंजीव त्यांना आम्ही निश्चित करु. एमआयएमच्या दोन मतांऐवजी आम्ही एका मताची पूर्तता करुन घेऊ. आम्ही त्यांना विनंती केली आहे. ते आम्हाला मतदान करतील की नाही? हे १० तारखेलाच कळेल, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

तसेच मला असं वाटतं की ते आम्हाला राज्यसभेच्या निवडणूकीत मतदान देतील. तसेच माझ्या उपकाराची परतफेड करायची असेल, तर त्यांना आम्हाला मतदान करावेच लागेल. मी संतोष दानवे यांचे वडील रावसाहेब दानवेंना १ लाख मतांची लीड मिळवून दिली होती, असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

अब्दुल सत्तार यांच्या दाव्याची राज्यभरात चर्चा होत आहे, असे झाले तर ते महाविकास आघाडीसाठी खुप फायद्याचे ठरु शकते. तसेच यामुळे भाजपच्या एका उमेदवाराचा पराभवही होऊ शकतो. त्यामुळे आता १० तारखेला सहावा उमेदवार नक्की कोणाचा जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-
सीन कट झाला तरी विनोद खन्ना डिंपल कपाडियाला करत होते किस, संतापलेल्या डिंपलने केले असे काही की..
राज ठाकरेंनी खोलले पत्ते; राज्यसभा निवडणूकीत मनसे आमदाराचे मत ‘या’ पक्षाला मिळणार
“एवढी आंदोलनं, आकांडतांडव करून काय उपयोग? तिकीट तर मिळालं नाही”, राष्ट्रवादीने काढला चिमटा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now