Share

रावसाहेब दानवेंनी केला शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; ‘भाजपाची शेण खाण्याची परंपरा सुरूच..

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही मालिका खंडित होण्याऐवजी वाढत आहे. शिंदे गट आणि भाजपमधील मंत्री आणि आमदारांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वादाला उधाण आले आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर दानवे बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात की महाराजांबाबत दिलेल्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. ते म्हणाले की, हे विधान वादग्रस्त ठरेल की नाही हे पाहणे बाकी आहे. आपण शिवप्रेमी असल्याचा दावाही त्यांनी केला.

मात्र या व्हिडिओमध्ये बोलताना त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले होते. साताऱ्यात त्याचा जोरदार परिणाम झाला. खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी दानवे यांच्या पोस्टरला काळे फासले.

https://twitter.com/Mrutyyunjay/status/1599370995374362624?s=20&t=dQPCwj9jzcT163vGlQCVvQ

साताऱ्यात रविवारी पोवई नाका येथील शिवतीर्थाजवळ खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी रावसाहेब दानवे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी मराठा संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली. आत्ता परत एकदा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेण खाल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांचा “शिवाजी” असा एकेरी उल्लेख.. भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली, याचा आणखी एक पुरावा. दानवेवर कारवाई करा. अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. तसेच रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

https://twitter.com/amolmitkari22/status/1599408179716448256?s=20&t=dQPCwj9jzcT163vGlQCVvQ

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करण्यातची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त भाषणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानाच भाजप नेते प्रसाद लाड यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड म्हणाले की शिवरायांचा जन्म कोकणात झाला.

नेमकं काय म्हणालेत प्रसाद लाड? ‘हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. अखिल भारताचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. शिवरायांचे बालपण रायगडमध्ये गेले आणि याच रायगडमध्ये त्यांनी स्वराज्याची शपथ घेतल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.’

यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली आहे. तेव्हापासून कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने केली जात आहेत. भाजप नेत्यांकडून एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने केली जात आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, राज्यमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यानंतर आता प्रसाद लाड यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

महत्वाच्या बातम्या
“मुजरा महाराज.. आपल्याला वचन देतो की…”, उदयनराजेंचं शिवरायांना भावूक पत्र: वाचा जसंच्या तसं..
Ajay Devgan daughter : अजय देवगणच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबत टाइट ड्रेसमध्ये पार्टी करतानाचे फोटो व्हायरल; पाहून व्हाल हैराण
Haryana : मुलीने केले मुस्लिम मुलाशी लग्न, वडिलांनी जबरदस्ती धर्मांतराचा आरोप लावत केला गुन्हा दाखल

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now