कोरोनाच्या काळात बंद असलेले चित्रपटगृहे कोरोनानंतर उघडली गेली. मात्र, त्यानंतर आलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तोंडघशी पडताना दिसले. असे असताना आता ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने मात्र चांगली कामगिरी केल्याची बातमी समोर येत आहे.
‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी शानदार ओपनिंग करत आतापर्यंत जगभरात ४२० कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर ब्रह्मास्त्र २०२२ मध्ये पहिल्या क्रमांकाच्या यादीत सामील झाल्याची माहिती देखील मिळत आहे.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे निर्माते अयान मुखर्जीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यांनी म्हंटले आहे की, ‘ब्रह्मास्त्र’ हा २०२२ मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. अयानने त्याच्या इंस्टाग्रामवर ब्रह्मास्त्रचे पोस्टर शेअर केले आहे.
या पोस्टरमध्ये ज्यामध्ये रणबीर कपूर त्याच्या ‘अग्नी अस्त्र’मध्ये दिसत आहे. पोस्टरवर असे लिहिले आहे की, २५ दिवसांत चित्रपटाने जगभरात ४२५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
अयान मुखर्जीच्या या पोस्टवर ब्रह्मास्त्रच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लोक ब्रह्मास्त्राची स्तुती करताना थकत नाहीत. त्यामुळे बॉलीवूडवर बहिष्कार असतानाही ब्रह्मास्त्रने इतके चांगले प्रदर्शन केल्याने काही सोशल मीडिया वापरकर्ते आनंदी आहेत. बहिष्कार घालणारे कुठे गेले, अशी टिप्पणी एका वापरकर्त्याने केली.
दुसऱ्या यूजरने लिहिले की, ब्रह्मास्त्रच्या यशाचे सर्व श्रेय मौनी रॉयला जाते. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अशा गतिमान खलनायकाची भूमिका करणारी ती एकमेव महिला आहे. चित्रपटाच्या पुढील भागात देव यांच्या मुलीच्या भूमिकेत मौनीला कास्ट करावे, असेही सुचवण्यात आले आहे.
माहितीनुसार, अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ बनवण्यासाठी ४१० कोटी खर्च आला होता. ज्यामध्ये चित्रपटाच्या प्रमोशनचा खर्चही समाविष्ट होता. या चित्रपटाने आपल्या दमदार अभिनयामुळे बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ची एकूण कमाई जगभरात ४२५ कोटी रुपयांवर गेली आहे.