सध्या सोशल मीडियावर सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष तसेच व्यवसायिक ललित मोदी यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे. नुकतेच सोशल मीडियावर ललित मोदींनी पोस्ट केलेल्या त्या दोघांच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
असे असताना आता या फोटोंवर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. रणवीर सिंहने कमेंट करत हार्ट इमोजी वापरला आहे. त्याच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावरून रणवीर त्या दोघांच्या नात्याबद्दल खुश असल्याचं समजत आहे.
तसेच क्रिकेटर हरभजन सिंगने देखील या कपलवर शुभेच्छांच्या प्रेमाचा वर्षाव केला आहे. शिल्पा शेट्टी आणि अनाइता श्रॉफने ललित मोदींच्या पोस्टला लाइक केलं आहे. अभिनेता विद्युत जामवालची होणारी पत्नी नंदिता मेहतानीने देखील हार्ट इमोजी पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
ललित मोदींनी सुष्मिता सेन सोबत आपले कितीतरी रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. त्यानं कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की, मी ग्लोबल टूर करून परत लंडनला परतलो आहे. कुटुंबासोबत मालदीव आणि सर्दानियाला गेलो होतो. मी आयुष्याची नवी सुरुवात करत आहे आणि मी खूश आहे.
तसेच लिहिले की, सुष्मिता सेन आणि मला दोघांना शुभेच्छा द्या. आज माझी स्वारी चंद्रावर आहे. मी खूप खूश आहे. प्रेमात पडलोय, याचा अर्थ असा नाही की मी लग्न केलं. अर्थात, देवाचा आशीर्वाद असेल तर ते देखील लवकरच होईल. मी फक्त एवढंच सांगितलं की आम्ही दोघं एकत्र आहोत.
दरम्यान, सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनची प्रतिक्रिया समोर आली आहे. तो म्हणाला की, मला या बाबतीत कोणतीच माहिती नव्हती. हे कधी आणि कसं झालं, मला याबद्दल काहीही ठाऊक नाही. मला याबाबत कोणताच अंदाज नाही. या बातम्या ऐकूण मी खूप आश्चर्यचकित झालो आहे, पण मी माझ्या बहिणीसाठी खूश आहे.