Share

दीपिकाच्या ‘गेहराइयां’ चित्रपटावर रणवीर सिंहने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, मला तुझा..

Ranveer Singh About Gehraiyaan

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहत चाहत्यांच्या संपर्कात असतात. याद्वारे रणवीर-दीपिका नेहमी एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असतात. यामध्ये ते दोघे कधी रोमँटिक अंदाजात दिसून येतात तर कधी मजामस्ती करताना. त्यांच्या या प्रत्येक पोस्ट्सना चाहत्यांकडूनही खूप पसंती दिली जाते.

यादरम्यान आताही रणवीर सिंहने दीपिकासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यामध्ये रणवीर-दीपिका लिपलॉक करताना दिसून येत आहेत. तसेच हा फोटो शेअर करत रणवीरने दीपिकाचे भरभरून कौतुक केले आहे. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, दोघेही समुद्रकिनारी असून रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. पांढऱ्या रंगाच्या व्हाईट शर्टमध्ये दीपिका आणि शर्टलेस रणवीर एकमेकांना लिपलॉक करताना या फोटोत दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत रणवीरने ‘गेहराइयां’ चित्रपटातील अभिनयाबद्दल दीपिकाचे कौतुक केले आहे.

फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘डुबे..हां डूबे..एक दुजे में यहां.. श्रेष्ठ, उत्तम, उत्कृष्ट. काय मास्टरक्लास परफॉर्मन्स आहे बेबी. खूपच दमदार, परिपूर्ण आणि मनाला भिडणारी कलात्मकता. तुझा अतुलनीय आणि सर्वोत्तम अभिनय. मला तुझा अभिमान आहे’. रणवीरची ही पोस्ट चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरत असून त्यावर ते लाईक्सचा वर्षाव करत आहेत. तसेच त्यावर भरभरून कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/p/CZ1m3zbBc4i/

रणवीरने शेअर केलेला हा फोटो अनेकांना आवडला असला तरी काही चाहत्यांनी मात्र रणवीरला ट्रोल केले आहे. एकाने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘सार्वजनिक ठिकाणी असे करणे योग्य नाही. तुम्हाला दोघांना घरात जागा मिळाली नाही का?’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘भावाने गेहराइयां चित्रपट बघून सिद्धांत चतुर्वेदीला दाखवण्यासाठी रागात ही पोस्ट शेअर केली असेल’.

दरम्यान, दीपिकाचा ‘गेहराइयां’ हा चित्रपट काल ११ फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे कथानक या चार कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांभोवती फिरते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले असून चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
वाढदिवस विशेष: किशोर कुमार यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर खुश नव्हती मधुबाला, वाचा यामागील कारण
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी अर्जुन कपूरने मोकळे केले मन; म्हणाला, ‘आमचे आयुष्य नरक झाले होते’
मैं झुकेगा नहीं साला! इंस्टाग्रामवर दीड कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असणारा अल्लू अर्जुन फक्त ‘या’ व्यक्तीला करतो फॉलो

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now