दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. जबरदस्त अभिनय, पटकथा, अफलातून ॲक्शन सीन आणि सुपरहिट गाणी याच्या जोरावर पुष्पा या चित्रपटाने तुफान प्रसिद्धी मिळवली आहे.(ranu-mandal-is-back-in-the-spotlight)
प्रामुख्याने लोकांमध्ये ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली’ या गाण्याला विशेष पसंती मिळत आहे. अल्लू अर्जुनने या गाण्यावर केलेल्या डान्सची नक्कल जणू प्रत्येक जण करुन दाखवत आहे. मात्र या सर्वांमध्ये खरं लक्ष वेधून घेतलं ते रानू मंडलने.
तिने केलेला डान्स पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. तेरी मेरी या गाण्यापासून रानू मंडल नावारूपाला आली होती. रानू मंडल ही सध्या तिच्या अनोख्या डान्समुळे चर्चेत आली आहे. ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली’ या अल्लू अर्जुनच्या गाण्यावर रानू मंडल थिरकताना दिसत आहे.
या गाण्यावर डान्स करताना तिने अल्लू अर्जुनची नक्कल केली आहे. तिच्या या फनी स्टेप्स पाहून अनेक जणांनी तिची खिल्ली उडवली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली’ हे गाणे देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले आहे. गीते चंद्रबोस यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. हे गाणं आत्तापर्यंत तमिळ, तेलगु, हिंदी, मल्याळम अशा चार भाषांमध्ये तयार करण्यात आले आहे.
या गाण्याला यू ट्युबवर १५९ मिलियन पेक्षा जास्त व्हीऊज मिळाल्या आहेत. या गाण्यावर अल्लू अर्जुनने केलेला डान्स तुफान लोकप्रिय झाला आहे. त्याचसोबत या चित्रपटातील अल्लू अर्जुनची ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली’ या गाण्यातील
ॲक्शन खूप जास्त फेमस झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
PHOTO: ब्रेस्टफिडींगचे फोटो शेअर करत अभिनेत्रींनी ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या, ‘ त्यात गैर काय?’
हिजाब वादावरून ट्विटरवर भिडले कंगना आणि शबाना आझमी, अफगानिस्तान-भारताबद्दल केले ‘ते’ ट्विट