Share

‘हाल कैसा है जनाब का?’ रानू मंडलचा आणि सलमान खानचा तो व्हिडीओ होतोय व्हायरल, तुम्ही पाहिला का?

Ranu Mandal

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याबाबत काहीच सांगता येत नाही. या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक एका रात्रीत स्टारही होऊ शकतात. याचाच एक उदाहरण म्हणजे रानू मंडल (Ranu Mandal). रेल्वे स्टेशनवर गाणं गात असताना रानू मंडल यांचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ त्या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

या व्हायरल व्हिडिओमुळे रानू मंडल एका रात्रीत स्टार झाल्या होत्या. त्यांचा व्हिडिओ पाहून बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियानेसुद्धा त्यांना एक गाणं गाण्याची संधी दिली होती. परंतु, रानू मंडल यांना त्यांचा स्टारडम सांभाळता आलं नाही. प्रसिद्धी मिळताच रानू मंडल यांचा अॅटिट्यूडच बदलला. त्यानंतर पाहता पाहता त्या गायबच होऊन गेल्या.

यादरम्यान रानू मंडल यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये रानू मंडल सलमान खानसोबत एका गाण्यावर जुगलबंदी करताना दिसून येत आहेत. realfascinated नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर २०२० साली हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला होता. परंतु आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत असून तो माध्यमात चर्चेत आहे.

या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, रानू मंडल आणि सलमान खान १९५८ साली आलेल्या ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटातील ‘हाल कैसा है जनाब का?’ हे गाणं गाताना दिसून येत आहेत. दोघांची या गाण्यावर जुगलबंदी होत असल्याचे या व्हिडिओत दिसत असले तरी हा सर्व एडिटिंगचा कमाल आहे.

मुळात हा व्हिडिओ रानू मंडल आणि सलमान खानच्या वेगवेगळ्या व्हिडिओजना एकत्र करून तयार करण्यात आलं आहे. मूळ व्हिडिओत रानू मंडल हिमेश रेशमियाचे गाणं गात आहे. तर सलमान खान ‘भाई भाई’ हे गाणं गात आहे. परंतु, या व्हायरल व्हिडिओत अशा पद्धतीने एडिट करण्यात आले आहे की, ‘हाल कैसा है जनाब का’ या गाण्यातील मेल व्हर्जन सलमान खान आणि फिमेल व्हर्जन रानू मंडल गात आहे.

दरम्यान, सलमान खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच तो ‘किक २’, ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘पवन पुत्र भाईजान’, ‘नो एंट्री’, ‘टायगर ३’ यासारख्या चित्रपटात दिसणार आहे. सध्या तो कतरिना कैफसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. रिपोर्टनुसार सलमान शाहरूख खानच्या ‘पठान’ या चित्रपटात केमियो करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
शाहरूख खानसोबतच्या भांडणावर पहिल्यांदाच अजय देवगनने सोडले मौन, म्हणाला, आम्ही दोघं..
नोराच्या स्टाईलने वाढवले स्टेजचे तापमान, शेजारी उभ्या असलेल्या रणवीरलाही फुटला घाम
VIDEO: उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ झाला लीक, सोशल मिडीयावर उडाली खळबळ

 

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now