भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinha naik nimbalkar) यांच्यावर त्यांच्याच कट्टर कार्यकर्त्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय?
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत. त्यांचेच निकटवर्तीय दिगंबर आगवणे यांनीच नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केला आहे. स्वराज ॲग्रो इंडिया ॲग्रो लिमिटेड या कारखान्याचे व स्वराज नागरी पतसंस्थेच्या संचालकांनी खोटी बीले देऊन आपली चार कोटी ४० लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप आगवणे यांनी केला आहे.
२००७ मध्ये डेअरीच्या बॉयलरसाठी निंबाळकर यांना लाकडे पुरवीत असल्याने आगवणे आणि निंबाळकर यांच्यात आर्थिक व्यवहार झाले. त्यानंतर रणजितसिंह यांना कारखाना सुरू करायचा होता, मात्र उभारणीसाठी त्याच्याकडे पुरेशी आर्थिक रक्कम उपलब्ध नव्हती, तेव्हा रणजितसिंह व संचालकांनी बँकांच्या संमतीने कर्ज काढले असल्याचे आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जात म्हटले आहे.
तसेच पुढे आगवणे यांनी म्हंटले आहे की, आयूर ट्रेडर्स कंपनीच्या खात्यातून नोव्हेंबर २०१७ मध्ये स्वराज कारखान्याच्या खात्यावर बग्यास खरेदीसाठी पाठविलेल्या रकमेचे मला बिल मिळाले नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर टर्न ओव्हर दाखवण्यासाठी मला ७ ते ८ कोटी रुपयांची खोटी बीले दिल्याचे आगवणे यांनी तक्रारीत म्हंटले आहे.
स्वराज पतसंस्थेचे निंबाळकर हे चेअरमन होते. २०१३ मध्ये त्याच्या पत्नी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या होत्या. तेव्हा निंबाळकर यांनी निवडणूक लढवण्यासाठी स्वराज पतसंस्थेत माझ्या नावे कर्ज काढले होते. तसेच सुरवडी येथील जमिन त्यांनी गहाण ठेवली. आणि त्या जमिनीवर कर्ज घेतले. माझी सही असून देखील रक्कम मिळाली नसल्याचा आरोप आगवणे यांनी केला आहे.
पुढे आगवणे यांनी आरोप केला की, फलटण शहरातील विविध जमिनींवर काढलेल्या कर्जातील तब्बल 4 कोटींपेक्षा जास्त रक्कम खासदार निंबाळकरांच्या खात्यात जमा केली आहे. आगवणे यांनी बँकेच्या सर्व देवाणघेवाणीचे उतारे या तक्रारीबरोबर जोडले आहेत. तसेच दिगंबर आगवणे यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरील साखरवाडी येथील जमीन गहाण ठेवून 226 कोटी रुपयांचे कर्ज काढून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणी खासदार निंबाळकर व सर्व संचालकांविरुध्द विश्वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी दिगंबर आगवणे यांनी फलटण पोलिस स्टेशनला केली आहे. तर दुसरीकडे आगवणे यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे चांगलेच अडचणीत आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ईशान किशनची गर्लफ्रेंड दिसते लाखात एक, बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या, पहा फोटो
“मुलाला बारावीत ९७ टक्के, तरीही देशात कुठेच ॲडमिशन मिळाले नाही”; नवीनचे वडील संतापले
वयाच्या ५५ व्या वर्षी शिकली सेंद्रिय शेती, आता उत्पनात झाली तिप्पट पटीने वाढ, कमावतात लाखो
रशियाने युक्रेनवर हल्ला करताच अंबानी-अडानींचे बुडाले तब्बल ८८ हजार कोटी, वाचा नेमकं काय घडलं..