ranjit savarkar allegation pandit nehru | काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. काळ्या पाण्याच्या शिक्षेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी इंग्रजांना पत्र लिहिले होते, असे राहूल गांधी यांनी म्हटले होते. तसेच राहूल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेले पत्रही दाखवले होते.
`त्यानंतर हा वाद वाढतच जाताना दिसून येत आहे. राज्यातून वेगवेगळे नेते यावर संतप्त प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. राहूल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातूनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. रणजीत सावरकर यांनी राहूल गांधींसोबत जवाहरलाल नेहरु यांच्यावरही निशाणा साधला.
राहूल गांधी यांचे मुद्दे खोडून काढताना रणजीत सावरकर यांनी नेहरुंवर गंभीर आरोप केले आहे. नेहरुंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली. इतकेच नाही, तर नेहरु यांनी १२ वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली, असा आरोप रणजीत सावरकर यांनी केला आहे.
राहूल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी नेहरुंवर गंभीर आरोप केले. पंडित नेहरुंनी यांनी भारतातील गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली होती. पंडित नेहरु आणि एडविना यांच्यातील पत्रव्यवहार ब्रिटिशांकडून मागवा आणि तो जाहीर करावा. ज्यांना आपण आपलं म्हणतो त्या नेहरुंनीच देशाची फसवणूक केली होती, असे रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे.
तसेच पंडित नेहरु हे ९ मे आणि १२ दरम्यान एकटेच शिमल्याला गेले होते. तिथे ते चार दिवस कुटुंबासोबत राहिले होते. त्यावेळी एडवीनाने ब्रिटिशांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये नेहरुंना आपले पाहूणे म्हणून बोलावले आहे. त्यांची आणि माझी चांगली मैत्री झाली आहे. पंडित नेहरु हे माझ्या नियंत्रणात आलेले आहे, असा उल्लेख एडवीनाने पत्रात केला होता, असे रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे.
तसेच पंडित नेहरुंनीच माउंटबॅटन यांना व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले होते. त्यावेळी भारताच्या २० हजार मुली या पाकिस्तानात होत्या. त्यावर बोलताना बॅटन म्हणाले होते की, हत्याकांड पाहून भारतीय नेत्यांना काय करावे हे कळत नव्हते. त्यामुळे मी नियंत्रण हातात घेतले. भारतातून गेल्यानंतर माउंटबॅटन यांना १२ वर्षे नेहरु देशाची माहिती देत होते, असे रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे.
नेहरुंना हनीट्रॅपमध्ये फसवण्यात आले होते. तसेच त्यात ते फसले हा त्यांचा गुन्हा आहे. मागील काही वर्षात अशा प्रकरणात अनेक लोकांना पकडण्यात आले, त्यांना शिक्षाही देण्यात आली. १२ वर्षे झालेल्या हनीट्रॅपवर राहूल गांधींनी उत्तर दिले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी, असेही रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
tabassum : धक्कादायक! बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकारच्या झटक्याने निधन
शेळीने दिला माणसारखा चेहरा असणाऱ्या करडाला जन्म; हुबेहुब माणूस दिसणारे करडू पाहायला तुफान गर्दी
दहशतीचे दुसरे नाव म्हणजे ‘वसिम बशीर’; कश्मीरमधून आणखी एक स्पिडगन टिम इंडीयात दाखल