Share

Bachchu Kadu : गुवाहटीला जाण्यासाठी बच्चू कडूंनी पैसे घेतले; फडणवीसांच्या जवळच्या मित्राचा खळबळजनक आरोप

devendra fadanvis bachchu kadu

rani rana allegation on bachchu kadu  | एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करत महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत ४० शिवसेनेचे आणि १० अपक्ष असे ५० आमदार गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले होते. एकनाथ शिंदे यांच्या बडखोरीमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.

अशात आमदारांनी बंडखोरी करण्यासाठी पैसे घेतले होते असा सातत्याने आरोप होत आहे. अशात खासदार नवनीत राणा या गंभीर आरोप करताना दिसत आहे. नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

बच्चू कडूंनी कार्यकर्त्याला मारहार केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर अनेक स्तरातून बच्चू कडू यांच्यावर टीकेची झोड उठली होती. याचाच धागा पकडत राणा यांनी कडूंवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी गंभीर आरोप केले आहे.

माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, बच्चू कडूंचे स्वत:वरचे नियंत्रण गेले आहे. त्यांनी स्वत:ला सांभाळायला पाहिजे. कार्यकर्त्यांना मारहाण करणं हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान बच्चू कडू यांनी ठेवायला हवा. बच्चू कडू हे सोंगाड्या आहे.

तसेच बच्चू यांनी रवी राणा यांच्यावर खिसा कापणारे म्हणत टीका केली होती. त्याला आता रवी राणांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, गुवाहटीला जाणाऱ्या बच्चू कडूने आरोप करताना दहावेळा विचार करायला हवा. विधानसभा आली तर तर त्यांना दमडी पाहिजे. राज्यसभा आली तर त्यांना दमडी पाहिजे.

त्यांना प्रत्येक निवडणूकीला पैसे पाहिजे. गुवाहटीला जायचं म्हटलं तर त्यांना पैसाच हवा. त्यांचे आयुष्यच पैसे आहे. बच्चू कडूने फक्त तोडीसाठी आंदोलने केली आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मला सांगायचे आहे. रवी राणामध्ये धमक आहे. तो गरीबांची मदत करतो. आदिवासी कुटुंबांसाठी रवी राणा स्वत:चा पगार खर्च करतो, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Shivsena : यापुढे शिवसैनिकांवर हल्ला झाल्यास…; जाधवांवरील हल्ल्यानंतर शिवसेना आक्रमक, शिवसैनिकांना दिले ‘हे’ आदेश
Narayan rane : नारायण राणेंवर केलेली आक्षेपार्ह टिका भास्कर जाधवांना भोवणार; पोलिसांनी सुरू केली ‘ही’ कठोर कारवाई
Bollywood: कहाणी त्या वेटरची जो बघता बघता बनला बॉलिवूडचा टॉप कॉमेडियन, जॉनी वॉकरलाही टाकले मागे

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now