बॉलिवूड कलाकार त्यांच्या पडद्यावरच्या भूमिकेपेक्षा खाजगी आयुष्यातील घटनेने अधिक प्रसिद्ध होतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे याची उत्सुकता चाहत्यांना असते. त्यांच्या छोट्या गोष्टी या चर्चेचा विषय ठरतात. अशीच चर्चा सध्या अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यातील नात्यांबद्दल होत आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांची लग्नापर्यंत पोहोचलेली प्रेमकथा अचानक ‘ब्रेकअप’च्या वळणावर येऊन का थांबली होती? याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. साधारणपणे, करिष्मा कपूरशी साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात राणी मुखर्जीची एंट्री झाली होती.
करिष्मा कपूरशी साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेकची राणी सोबत जवळीकता वाढली होती. ‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘युवा’ असे चित्रपट देणारे अभिषेक आणि राणी एकाच वेळी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यावेळी त्यांच्या प्रेमाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत होत्या.
चित्रपटात एकत्र काम करण्यातून त्यांची चांगली गट्टी जमली. मित्राच्या नात्याचे नंतर प्रेमात रूपांतर झालं. माहितीनुसार, नंतर अभिषेक आणि राणी ‘लागा चुनरी में दाग’ या चित्रपटात काम करत होते, त्यावेळी त्यांच्या नात्यात दरी निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. यावर देखील चर्चा रंगल्या होत्या.
लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यासाठी अभिषेकच्या कुटुंबातील एक सदस्य कारणीभूत आहे असे बोलले जात होते. अभिषेक आणि राणीच्या ब्रेकअपनंतर, अभिषेकच्या कुटुंबातील एका सदस्यामुळे दोघे विभक्त झाल्याची बातमीही समोर आली होती.
अभिषेक आणि राणी यांना वेगळं करणारा सदस्य दुसरा तिसरा कोणी नसून, अभिषेकची आई जया बच्चन आहेत,असे बोलले गेले. त्यांच्या तुटणाऱ्या नात्याबद्दल दोघांनाही विचारले असता त्यांनी यावर कोणत्याच प्रतिक्रिया दिल्या नाहीत. त्यामुळे त्यांचं नातं नेमकं का मोडलं याचा खरा खुलासा अजून झाला नाही.