टीव्ही हा आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. टीव्हीवरील वाहिन्यांवर दररोज अनेक मालिकांची रेलचेल सुरु असते. या मालिकांद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते. तर ज्या मालिकांना प्रेक्षकांची जास्त पसंती मिळते त्यावरून त्या मालिकांची टीआरपी ठरत असते. तर आता मराठी मालिकांचा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. तर टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाह वाहिनीवरील एका प्रसिद्ध मालिकेने अव्वल स्थान मिळवले आहे.
टीआरपीच्या शर्यतीत प्रथम येण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जाते. तर ते ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले की नाही हे टीआरपीवरून कळते. तर टीआरपीच्या या यादीत झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने दहावा क्रमांक मिळवला आहे. तर नवव्या क्रमांकावर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ ही मालिका आहे.
आठव्या क्रमांकावर ‘ठिपक्यांची रांगोळी’ आणि सातव्या क्रमांकावर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका मागील आठवड्यात सातव्या क्रमांकावर होती. तर या आठवड्यात ही मालिका सहाव्या क्रमांकावर आली आहे. तर ‘मुलगी झाली हो’ ही मालिका मागील दोन आठवड्यांपासून पाचव्या क्रमांकावर कायम आहे.
नेहमी अग्रस्थानावर असणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा टीआरपी मागील काही आठवड्यांपासून घसरला आहे. या आठवड्यात ही मालिका थेट चौथ्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे. तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यावेळी ‘स्टार प्रवाह धुमधडाका २०२२’ या कार्यक्रमाने दुसरा क्रमांक फटकावला आहे. तर या शर्यतीत मागील आठवड्याप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीवरीलच ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने आपले अव्वल स्थान कायम ठेवत पहिला क्रमांक मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
किरण मानेंनी महीला कलाकारांशी गैरवर्तन केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढले; स्टार प्रवाहने दिले स्पष्टीकरण
वाढदिवस विशेष: एकेकाळी सिमेंटच्या फॅक्टरीत काम करायचा, आज आहे सगळ्यात महागडा अभिनेता
अशा प्रवृत्तींना आमच्या गावात प्रवेश नाही; ग्रामपंचायतीनं बंद पाडलं ‘मुलगी झाली हो’चं शुटींग