Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी “कंत्राटी मुख्यमंत्री” म्हणून हिनवणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आज सडेतोड उत्तर दिले. सभागृहात एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘होय.. मी कंत्राटी मुख्यमंत्रीच आहे. राज्याच्या विकासाचं, राज्य समृद्ध करण्याचं, लोकांमध्ये मिसळून त्यांचे दुःख दूर करण्याचं, लोकांचे अश्रू पुसण्याचं कंत्राट मी घेतलंय.’
‘बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं, बहुजनांच्या विकासाचं कंत्राट मी घेतलंय, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा घणाघाती टीकेला जबरदस्त उत्तर दिले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचल्याचे दिसते.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘काल ते मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हणाले, पण मला त्यांना सांगायचंय, मागील वर्षी नारायण राणेसाहेबांना जेवता जेवता ताटावरून उचलले, जेलमध्ये डांबले. कारण काय तर मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द उच्चारले म्हणून..’
‘आता सांगा तुम्ही तर मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हणताय, मग मी काय करायला हवे?… पण आम्ही घटनेच्या विरोधात कोणतेही कृत्य करणार नाही,’ अशाप्रकारे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा वार परतवून लावला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर होणाऱ्या अनेक आरोपांना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान काल उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सर्वकाही कमी पडत आहे. म्हणून त्यांचा संपूर्ण देशातील दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार चोरण्याचा, फोडण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे.भाजप राष्ट्रीय पक्ष आहे की, चोरबाजार.., असा गंभीर आरोप त्यांनी केला.
पुढे ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कंत्राटी आहेत. ते किती काळ राहतील हे त्यांनाच माहीत नाही,’ अशा शब्दात खरमरीत टीका उद्धव ठाकरेंनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली होती. मात्र आज ‘होय.. मी कंत्राटी मुख्यमंत्रीच, कारण मी राज्याच्या विकासाचे कंत्राट घेतले आहे, असं म्हणत शिंदेंनी त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरे वरळीच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार, मात्र.., बंडखोरांना दिली एक अट
Krushna Prakash: “बाप्पाला तू शेवटपर्यंत जवळ ठेवलंस, गणपती येताहेत अन् तू गेलीस” IPS कृष्णप्रकाश गहीवरले
मृत्यूच्या 12 तासांनंतर एक चिमुकली अचानक जिवंत झाली आणि…, वाचून पायाखालची जमीन सरकेल