Share

Politics: “उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा आणि राज ठाकरेंना कामे मिळत आहेत”

raj uddhav thakre

राजकारण(Politics): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार व १२ खासदारांना सोबत घेऊन शिवसेनेसोबत बंडखोरी केली. नंतर त्यांनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार कोसळले. तेव्हापासून ठाकरे व शिंदे गटात अनेक वाद चालू आहे. त्यांच्या वादात कोणत्या ना कोणत्या कारणाने भर पडतच आहे. याच वादात आणखी एक भर पडली. ती यावरून की, यावर्षी दसरा मेळावा कोण घेणार?

शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेची या वादाला अजून उधाण आलेले दिसत आहे. शिंदे अजूनही ठणकावून सांगताहेत की शिवसेना आमचीच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यात येणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. हा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असून, भाजपही पडद्यामागून मदत करत असल्याची चर्चा सुरू आहे.

अशातच राज ठाकरे यांचेही भाजपच्या नेत्यांसोबत उठणे बसने वाढले आहे. या सर्व घडामोडींवरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे, नारायण राणे आणि राणा दाम्पत्यावर टीका केल्या आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळत आहेत. कोणत्याही कार्यकर्त्याला आपल्या नेत्याबाबत अभिमान वाटणे सहज स्वाभाविक आहे.

आपल्या नेत्यामध्ये चांगले गुण आहे, ते नेतृत्व करण्यास सक्षम आहे, असे वाटणेही अत्यंत सहज सुलभ आहे. या न्यायाने मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्याबाबत काही वाटत असेल, तर त्याबद्दल आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. पुढे त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलण्याची सर्व कंत्राटे भाजपने काढली आहे. नवनीत राणा, नारायण राणे आणि राज ठाकरे ही सगळी मंडळी कंत्राट मिळवण्यासाठी फार उत्सुक आहेत.

आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की, मुख्यमंत्री पदावर नसतानाही उद्धव ठाकरेंमुळे राजकीय रोजगार हमी योजनेची कामे या सगळ्यांना मिळू शकत आहेत. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावले, म्हणाले ५६ वर्षांत शिवसेनेने असे ५६ लोक पाहिले. शिवसेना आणि शिवसैनिक आहे तिथे ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सुनावले.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून वाद अजिबात नाही. पुढे उद्धव ठाकरे बोलले की, दसरा मेळावा आमचाच, म्हणजे शिवसेनेचाच होणार आणि शिवतीर्थावरच होणार. तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक भाग आहे, ते बघूच. पण आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावले आहे.

महत्वाच्या बातम्या
Asaram Bapu : आसाराम बापूंच्या भक्तांचा पुण्यात मूकमोर्चा, आसाराम बापूंना सोडण्याची मागणी
Aanna Hajare: जशी दारूची नशा असते, तशीच तुम्हाला सत्तेची नशा चढलेली दिसते; अण्णा हजारेंनी केजरीवालांना खडसावले
Asim Sarode : गायीच्या शेणापासून गणपतीची मूर्ती बनवणे हा देवाचा अपमान आहे, असे म्हणणाऱ्यांना ऍड. असीम सरोदे यांनी सुनावले
Accident: अंगावर काटा आणणारा अपघात; कारच्या धडकेत चिमुकल्यासह महिला पोलीस आईही ठार

राज्य इतर ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now