Share

खरा हिरो! ५ वर्षांपुर्वी दिलेले वचन केले पुर्ण, रणदीप हुड्डाने सरबजीतच्या बहिणीच्या पार्थिवाला दिला खांदा

‘रणदीप हुड्डा मला भावासारखा आहे. मी रणदीपकडून एक वचन घेतले आहे की जेव्हा मी हे जग सोडून जाईल तेव्हा त्याने माझ्या अर्थीला खांदा दिला पाहिजे…’ ५ वर्षांपूर्वी जेव्हा ‘सरबजीत’ चित्रपट आला तेव्हा पाकिस्तानच्या तुरुंगात शहीद झालेल्या सरबजीत सिंगची बहीण दलबीर कौरने रणदीपकडून हे वचन घेतले होते. रणदीप हुड्डा याने देखील तिला वचन दिले होते. आता जेव्हा ५ वर्षांनी दलबीर कौर यांचे निधन झाले तेव्हा रणदीप हुड्डा आपले वचन पूर्ण करण्यासाठी पोहोचले.(Randeep Hooda, Vachan, Dalbir Kaur, passed away)

दलबीर कौर यांचे शनिवारी म्हणजेच २५ जूनच्या रात्री निधन झाले. तिला अमृतसर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तेथेच तिने अखेरचा श्वास घेतला. रणदीप हुड्डाला ही बातमी समजताच तो सर्व काही सोडून सरबजीत सिंगच्या बहिणीच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी पोहचला आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहिला.

दलबीर कौर यांच्यावर रविवारी (२६ जून) भिखीविंडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दलबीर कौरच्या कुटुंबीयांनाही रणदीप हुड्डा येईल अशी अपेक्षा नव्हती. रणदीप हुड्डा भिखीविंडला पोहोचला. त्यांनी दलबीर कौरच्या कुटुंबीयांचे सांत्वन तर केलेच, पण दलबीरला अखेरचा निरोपही दिला. रणदीप हुड्डा यांनी सरबजीतच्या बहिणीच्या मृतदेहाला केवळ खांदाच दिला नाही तर चिताही पेटवली.

randeep hooda sarabjit sister last rites

रणदीप हुड्डा याने २०१६ मध्ये आलेल्या ‘सरबजीत’ चित्रपटात दलबीरचा भाऊ सरबजीतची भूमिका साकारली होती. सरबजीत गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या कोट कालाखापत तुरुंगात बंद होता. बहिण दलबीर यांनी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भावाला परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली होती आणि अनेक वर्षे संघर्ष केला होता. भाऊ-बहिणीचा हा संघर्ष आणि त्यांचे नाते ‘सरबजीत’ चित्रपटात दाखवण्यात आले होते.

या चित्रपटात रणदीप हुड्डा सरजाबितच्या भूमिकेत होता, तर ऐश्वर्या राय बच्चनने त्याची बहीण दलबीर कौरची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला दलबीर कौर देखील उपस्थित होती आणि रणदीपला सरबजीतच्या भूमिकेत पाहून ती भावूक झाली. तेव्हाच तिने रणदीप हुड्डा यांच्याकडून वचन घेतले की तो तिच्या अर्थीला खांदा देईल.

दलबीर कौर म्हणाली होती की, ‘मला रणदीपला सांगायचे आहे की मी माझा भाऊ सरबजीत त्याच्यामध्ये पाहिला आहे. माझी एक इच्छा आहे. मी रणदीपकडून एक वचन घेऊ इच्छिते की, मी मरेन तेव्हा तो मला नक्कीच खांदा देईल. भावाने मला खांदा दिला या विचाराने माझ्या आत्म्याला शांती लाभेल. मला माझा भाऊ रणदीप मिळाला याचा मला खूप आनंद होईल. चित्रपटात तो केवळ नायकच नाही तर माझा भाऊही आहे.

महत्वाच्या बातम्या-
राहुल जैन नाव सांगू २ वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिला अब्दुल वसीम, लग्नाचं वचन देऊन केला बलात्कार
तेव्हा शंकराने मार्तंड भैरवाच्या रुपात भंडारा मस्तकी धारण केला अन् रात्रीला दिलेले वचन पुर्ण केले
भारीच! आनंद महिंद्रांनी इडली अम्मांना दिलेलं वचन केलं पूर्ण, मातृदिनाच्या दिवशीच घर दिलं भेट
आता तर हद्दच झाली! पुनम पांडेने पुन्हा दिले टॉपलेस होण्याचे वचन, म्हणाली यावेळी ब्रा पण काढेन

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now