Share

रणबीर आलियाला जुळं होणार?; स्वतः रणबीर याबाबत म्हणाला की…

एप्रिलमध्ये बॉलीवूडचे क्युट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आलियाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर सोनोग्राफी रूममधला तिचा एक फोटो शेअर करून गुड न्यूज दिली. त्यामुळे चाहत्यांमध्ये यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. (Ranbir said, ‘I am going to have twins)

अनेक बातम्या या संदर्भात येत होत्या. आता एक नवीन अपडेटनुसार, आलियाला जुळं होणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. यामागे नक्की काय कारण आहे, हे आपण जाणून घेऊया.

शमशेरा या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला रणबीर कपूर एका कार्यक्रमात गेला होता. त्यावेळी त्याला एक खेळ खेळायला सांगण्यात आले. त्यानुसार त्याने दोन गोष्टी सांगाव्यात. त्यामधील खरी गोष्ट कोणती? आणि खोटी गोष्ट कोणती? हे चाहत्यांना ओळखण्यास सांगितले जाणार होते.

तेव्हा रणबीरने सांगितले की, ‘मला जुळी मुलं होणार आहे. मी एका पौराणिक चित्रपटाचा भाग असणार आहे. आणि मी कामामधून ब्रेक घेणार आहे.’ रणबीरच्या या बोलण्यामुळे चाहते गोंधळले.

चाहत्यांकडून रणबीरला जुळी मुलं होणार आहेत, ही गोष्ट खरी आहे. तर तो कामावरून ब्रेक घेणार आहे, ही गोष्ट खोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर रणबीरच्या बोलण्याबाबत अनेक चाहते आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

या कपलला डॉक्टरने जुळं होणार असल्याचे तर सांगितले नाही ना? याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. त्यामुळेच रणबीर- आलिया यांना जुळं होणार हा विषय सोशल मीडियावर रंगला आहे. रणबीरकडून मात्र अजून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे शिंदेगटात गेले पण म्हणाले मेलो तरी शिवबंधन सोडणार नाही
‘…तर एकनाथ शिंदे आणि फडणवीस सत्ता जाऊ शकते’; घटनातज्ज्ञांचे मत
हातातले शिवबंधन सरणावर गेल्यावरच सुटेल; पक्ष सोडतानाही शिवसेना नेत्याची भावूक प्रतिक्रिया

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now