Share

रणबीर कपूरचा ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच वादात; काय आहे नेमकं कारण वाचा

रणबीर कपूरचा ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. अशातच दुसरीकडे ट्विटरवर #BoycottBrahmastra हा देखील ट्रेंड सुरू आहे. आता नेमकं असं काय झालं ज्यामुळे लोक या सिनेमाला Boycott करू लागले जाणून घेऊयात.

‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्यामुळे फॅन्स खूप खूश झाले होते. या सिनेमात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाच्या VFX सीनचं कौतुक सुरू आहे. सिनेमातील बॅकग्राऊंड संगीत देखील लोकांना प्रचंड आवडलं आहे.

पण अचानक ट्विटरवर #BoycottBrahmastra ट्रेंड सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे, ट्रेलरमध्ये लोकांना असं काही दिसलं ज्यामुळे लोकांचा संताप झाला आहे. या ट्रेलरला स्क्रिन शॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी रणबीर कपूरला देखील यावरून धारेवर धरलं आहे.

या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, रणबीर कपूर मंदिरात प्रवेश करतोय. उडी मारून घंटा वाजवतो. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की त्यानं पायात बूट घातले आहेत. त्यामुळे आता सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या.

काहींनी सिनेमा पाहू नका असे सांगत प्रतिक्रिया दिली. तर एकाने बूट घालून मंदिरात प्रवेश? ही अपेक्षा नव्हती. बाॅलिवूड कधीही सनातन धर्माला दुखवायची संधी सोडत नाही. असं ट्विट केलं. त्यानंतर ही बाब सर्वत्र झाली, नेटकऱ्यांनी मग #BoycottBrahmastra म्हणायला सुरुवात केली.

https://twitter.com/DhaakadRoy/status/1537289898193199104?t=ICC0GGbJrAMhQsjXagOZ0g&s=19

सिनेमाच्या ट्रेलर बद्दल बोलायचे झाल्यास, या सिनेमात रणबीर कपूर-आलिया भट्टची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना आवडली आहे. ट्रेलर मध्ये खूप अँक्शन आहे. यासिनेमाची तुलना हाॅलिवूड सिनेमाशी केली जात आहे. पण या व्यतिरिक्त सिनेमात लोकांना रणबीर कपूरने मंदिरात चप्पल घातलेली दिसली तेव्हा तो ट्रोल झाला.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now