Share

रणबीर कपूरला दहावीत मिळाले होते फक्त एवढे गुण, म्हणाला, पास झालेलो मी कुटुंबातील पहिला व्यक्ती

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा शमशेरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शमशेराच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये तो इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर डॉली सिंगसोबत दिसला. त्याने यावेळी डॉलीसमोर त्याच्या अभ्यासाबाबत खुलासा केला आहे. सध्या दोघांच्या संभाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये रणबीर कपूरने खुलासा केला आहे की, तो अभ्यासात चांगला नव्हता. त्याने सांगितले की, जेव्हा तो दहावीत पास झाला तेव्हा कपूर कुटुंबाने एका पार्टीचे आयोजन केले होते. तो त्याच्या कुटुंबातील पहिला असा मुलगा आहे, जो १० वी पास झाला होता.

इन्स्टग्रामच्या या व्हिडीओमध्ये डॉली राजूच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. तिने रणबीरला विचारले की दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने विज्ञान किंवा गणित घेतले होते का? यावर उत्तर देताना रणबीर म्हणाला, त्याने अकाऊंट्स घेतले होते.

त्यानंतर, डॉलीने विचारले की तू अभ्यासात कमकुवत होतास का? यावर रणबीरने प्रामाणिकपणे उत्तर दिलं, होय ‘मी अभ्यासात खूप कच्चा होतो असे तो म्हणाला. मग डॉलीने रणबीरला त्याच्या दहावीच्या गुणांबद्दल विचारले. यावर रणबीरने ने जे उत्तर दिलं ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल.

रणबीर म्हणाला, मला दहावीत ५३.४% ​टक्के मिळाले ​होते. जेव्हा माझा निकाल आला तेव्हा माझे कुटुंब इतके आनंदी होते की, त्यांनी माझ्यासाठी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. कारण कोणालाही आशा नव्हती की, माझ्या कुटुंबातील मुलगा दहावी पास होईल.

तसेच म्हणाला, मी माझ्या कुटुंबातील पहिला सदस्य होतो जो दहावी पास झाला आहे. यावर डॉली म्हणाली की, कपूर कुटुंब अभ्यासात कमकुवत पण अभिनयात उत्कृष्ट होते. यावर रणबीरने उत्तर दिले की, मला माहित नाही पण धन्यवाद. रणबीरच्या शिक्षणाबद्दल ऐकून सर्वच चकीत झाले आहेत.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now