Share

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट पाहिल्यानंतर बॉयफ्रेंड रणबीरची काय प्रतिक्रिया होती? आलिया भट्ट म्हणाली..

मागील अनेक दिवसांपासून नेहमी एका गोष्टीची चर्चा होत आहे. ते म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची चर्चा. मागील अनेक दिवसांपासून चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा होती. चाहत्यांची ही प्रतीक्षा २५ फेब्रुवारीला संपली आहे. तीन दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटासाठी सर्वजण आलियाचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर आलियाने या चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी ही एकट्याने उचलली होती. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे.

 

इतकेच नव्हे तर, ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट आलियाच्या कुटुंबानेही थिएटरमध्ये पाहिला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले. मात्र बॉयफ्रेंड रणबीर कपूरची अजूनही कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. विशेष म्हणजे रणबीर सध्या सोशल मीडियावरही सक्रिय दिसत नाही. त्यामुळे चाहते रणबीरला या चित्रपटाबाबत विचारूही शकत नाहीत.

 

अशा परिस्थितीत रणबीरला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट आवडला की नाही, असा प्रश्न आलियाला वारंवार विचारला जात आहे. नुकताच आलियाला माध्यमांशी बोलताना हा प्रश्न विचारण्यात आला होत. तर आलियाने त्यावर असे काही उत्तर दिले आहे. जे ऐकून सर्वांनाच धक्का असला आहे.

 

यावर उत्तर देत आलिया म्हणाली की, ‘रणबीरने चित्रपट पाहिला आहे आणि सर्वांना रणबीरचा प्रतिसाद हवा आहे. पण तो सध्या सोशल मीडियावर सक्रिय नाही. असा परिस्थिती आलिया त्याला समजावत आहे की, त्याने तिच्या या चित्रपटाबद्दल काहीतरी प्रतिक्रिया द्यावी. जेणेकरुन चाहत्यांना त्याची प्रतिक्रिया मिळू शकेल.

 

रणबीरने आलियाच्या चित्रपटाबद्दल आजवर काहीही सांगितले नाही. पण रणबीरची आई अभिनेत्री नीतू सिंह यांनी आलियाचे खूप कौतुक केले. इतकेच नव्हे तर, तिच्याबद्दल प्रेम देखील दाखवले आहे. तसेच चित्रपट पाहिल्यानंतर नीतू सिंहने इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. त्याचबरोबर असे ही लिहिले होते की, ‘पाहा आलियाने षटकार मारला आहे.’

 

या चित्रपटामुळे फक्त सर्व सामान्य लोक नाही तर सेलिब्रिटी देखील आलियाने कौतुक करत आहे. चित्रपट, चित्रपटाची कथा आणि चित्रपटातील आलियाचा अभिनय सर्वांनाच खूप आवडले आहे. आता हा चित्रपट पुढे काय काय कमाल करेल हे पाहणे महत्वाचे असेल.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now