Share

‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या सेटवरून समोर आला नवा फोटो; एकमेकांच्या नजरेत हरवलेले दिसून आले रणबीर-आलिया

Ranbir Kapoor And Alia Bhatt

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Ranbir Kapoor And Alia Bhatt) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबत प्रोफेशनल लाईफमुळेही माध्यमात चर्चेत आहे. लवकरच ही रिअल लाईफ जोडी रिल लाईफमध्येही एकत्र दिसणार आहे. ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाद्वारे दोघेही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यादरम्यान ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या सेटवरून या दोघांचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये रणबीर आणि आलिया एकटक एकमेकांना पाहताना दिसत आहेत.

रणबीर आणि आलियाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत दिसत आहे की, दोघे एका मोठ्या गेटजवळ उभे आहेत. तसेच दोघेही एकमेकांचे हात पकडले असून दोघे एकमेकांच्या नजरेत हरवलेले दिसत आहेत. रणबीर-आलियाचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत असून चाहते त्यांच्या फॅन पेजवर हा फोटो शेअर करत आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये रणबीर कपूर शिवच्या भूमिकेत आणि आलिया भट्ट ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. सुरुवातीला चित्रीकरणामुळे आणि नंतर कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यास बराच वेळ लागला. परंतु, आता ९ सप्टेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

रणबीर-आलियाशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटासाठी ओळखले जाणारे अयान मुखर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर यापूर्वीच रिलीज करण्यात आले होते. तर पोस्टर पाहून चित्रपट खूपच दमदार असणार, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाशिवाय रणबीर कपूर लवकरच ‘शमशेरा’ या चित्रपटातही दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. याशिवाय रणबीर श्रद्धा कपूर आणि लव रंजनसोबत एका प्रोजेक्टवर काम करत असल्याचेही वृत्त समोर येत आहे.

दूसरीकडे, आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांमुळेही फारच चर्चेत आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तर ‘आरआरआर’ हा चित्रपट २५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
‘क्या से क्या हो गये देखते देखते’ म्हणत रितेश-जेनेलियाने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शेअर केला व्हिडिओ
दीपिकाच्या ‘गेहराइयां’ चित्रपटावर रणवीर सिंहने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, मला तुझा..
मैं झुकेगा नहीं साला! इंस्टाग्रामवर दीड कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असणारा अल्लू अर्जुन फक्त ‘या’ व्यक्तीला करतो फॉलो

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now