बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. २५ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर पाहून आलिया खूपच कौतुक करण्यात आले. यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना आलियाने रणबीर कपूरसोबत तिचा लग्न झाल्याचा खुलासा केला (ranbir kapoor and alia bhatt )आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलियाने एनडीटीव्हीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना आलियाने तिचे आणि रणबीरचे लग्न झाल्याचे म्हटले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. परंतु, आलियाच्या या वक्तव्यामागे एक ट्विस्ट आहे. ते म्हणजे आलिया आणि रणबीरचे खरोखर लग्न झाले नसून आलियाच्या मते तिने तिच्या मनाने रणबीरला कधीच तिचा पती मानले आहे.
आलियाने म्हटले की, ‘माझ्या डोक्यात मी कधीच रणबीर कपूरसोबत लग्न केलं आहे’. आलियाच्या या उत्तराने स्पष्ट होते की, ती रणबीर कपूरवर किती प्रेम करते. तसेच दूसरीकडे रणबीर कपूरनेही यापूर्वी एका मुलाखतीत बोलताना म्हटले होते की, जर कोरोना महामारी आली नसती तर आतापर्यंत आलियासोबत त्याचे लग्न झाले असते.
आलिया जरी मनाने रणबीरला पती मानत असली तरी चाहते दोघांना वर-वधूच्या रूपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दोघांच्या लग्नासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, ते दोघे यावर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचे सांगितले जात आहे.
आलिया आणि रणबीरने सुरुवातीला त्यांचे नाते खूपच सीक्रेट ठेवले होते. पण आता ते दोघे मोकळेपणाने एकमेकांना डेट करण्याबाबत आणि लग्न करण्याबाबत बोलत आहेत. नुकतीच आलिया आणि रणबीर नवीन वर्ष साजरा करण्यासाठी आफ्रिकेला गेले होते. यादरम्यानचे काही फोटो आलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच तिने बॉयफ्रेंडने काढलेले फोटो म्हणत रणबीर सिंगला नाव न घेता श्रेय दिले होते.
दरम्यान, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाशिवाय आलिया लवकरच ‘आरआरआर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बाहुबली फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी केले असून यामध्ये आलियासोबत ज्युनियर एनटीआर, रामचरण आणि अजय देवगन मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय आलिया रणबीर कपूरसोबत ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातही दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
आपल्या सर्वांचा लाडका ‘शक्तिमान’ पुन्हा येणार रुपेरी पडद्यावर, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
वडिलांचे निधनाने दुखा:त बुडाली अभिनेत्री रविना टंडन; म्हणाली….
एजाज खानने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला दिला धोखा? सर्वांसमोर तिची माफी मागत म्हणाला.