बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Ranbir Kapoor And Alia Bhatt) सध्या माध्यमात फारच चर्चेत आहेत. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार १३ ते १७ एप्रिलदरम्यान ते दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हळूहळू लग्नासंदर्भात अनेक गोष्टी समोर येत आहेत. यादरम्यान आता या लग्नात कोणकोणते सेलिब्रिटी हजर राहणार आहेत, यासंदर्भात माहिती समोर आली आहे.
रणबीर आणि आलियाचे लग्न सिनेसृष्टीतील एक शाही विवाहसोहळा असणार आहे. त्यामुळे या सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी मंडळी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर या यादीत संजय लीला भन्साळी, करण जोहर, जोया अख्तर, मसाबा गुप्ता, वरूण धवन त्याचा भाऊ रोहित धवन या सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.
आलिया आणि रणबीरच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीसुद्धा या लग्नात सहभागी होणार आहेत. याशिवाय बॉलिवूडमधील इतरही काही सेलिब्रिटी या सोहळ्यास हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये अर्जून कपूर, मनीष मल्होत्रा, अनुष्का रंजन यांच्या नावाचा समावेश आहे.
रिपोर्टनुसार असेही सांगण्यात येत आहे की, आलियाने ‘डियर जिंदगी’ चित्रपटातील तिचा सहकलाकार बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानलाही तिच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे. तर शाहरुखसुद्धा या लग्नात हजेरी लावण्याची शक्यता आहे.
रणबीर आणि आलियाच्या या जवळच्या मित्रांशिवाय दोघांच्या कुटुंबीयसुद्धा या शाही विवाहसोहळ्यात सहभागी होणार आहेत. यामध्ये नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, करीना कपूर खान, करीश्मा कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या नावाचा समावेश आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार रणबीर लग्नापूर्वी बॅचलर पार्टीचे आयोजन करू इच्छित आहे. तर ही पार्टी तो त्याच्या घरीच करण्याची योजना करत आहेत. या पार्टीत त्याच्या बालपणीचे आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. या यादीत अर्जून कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अयान मुखर्जी यांच्या नावाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मी ज्यांना ओळखत होते त्या सगळ्यांसोबत माझ्या पतीचे शारिरीक संबंध होते, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला वेगळे वळण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री, नाव वाचून व्हाल अवाक
टीआरपीच्या शर्यतीत ‘ही’ मालिका ठरली नंबर १; टॉप १० मध्ये स्टार प्रवाहवरील मालिकांनी मारली बाजी