आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची (Alia Ranbir Wedding) अजूनही चर्चा होत आहे. कधी मेहंदी तर कधी हळदीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत येत असतात. असाच नीतू कपूरच्या संगीत सोहळ्याचा डान्स व्हिडिओ (Neetu Kapoor Dance Video) समोर आला आहे. हा एक रिहर्सल व्हिडिओ आहे ज्यामध्ये नीतू कपूर डान्स ट्रेनिंग घेताना दिसत आहे.(ranbir-kapoor-alia-bhatts-chaiya-chaiya-failed-in-front-of-neetu-kapoor)
लाडक्या रणबीर कपूरच्या लग्नात नीतू कपूरने खूप एन्जॉय केला. अतिशय सुंदर पोशाख घालून तिने आपल्या मुलाच्या लग्नात जोरदार डान्स केला. दरम्यान, नीतू कपूरचा रिहर्सल व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की मुलाच्या लग्नात नीतू कपूरने कोणत्या गाण्यावर डान्स केला.
सोशल मीडियावरील एका फॅन पेजने नीतू कपूरचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये ती सून आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील ‘ढोलिडा’ गाण्यावर डान्स रिहर्सल करताना दिसत आहे, तर दुसऱ्या गाण्यात ती ‘क्यूटीपाई’ या गाण्यावर खास डान्स परफॉर्मन्सची तयारी करताना दिसत आहे. तसेच तिसर्यामध्ये ‘मेहंदी है रचने वाली’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचे फंक्शन 13 एप्रिलपासून सुरू झाले होते. 13 तारखेला दोघांची मेहंदी आणि गणेशपूजनाचा विधी होता. 14 एप्रिल रोजी सकाळी हळदी विधी पार पडला आणि दुपारी 4 च्या सुमारास विवाह संपन्न झाला. रात्री 8 वाजता दोघेही मीडियाला भेटले.
रणबीर कपूरच्या लग्नात नीतू कपूरने कुटुंबासोबत खूप धमाल केली. ज्याच्या अनेक झलक नीतू कपूरने स्वतः सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. आता लग्न झाले असून तिची सूनही घरी आली आहे. अशा स्थितीत नीतूने आपल्या घरातील गुपिते उघड करताना सून घरी आल्यानंतरची घरची परिस्थिती सांगितली असून घरात फक्त सुनेचेच चालते असे म्हटले आहे.
रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतर नीतू कपूर आता तिच्या कामावर परतली आहे आणि सध्या ती ‘डान्स दीवाने’ ज्युनियर या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. नीतू यांच्यासह नोरा फतेही आणि कोरिओग्राफर मार्झी पेस्टोनजी या शोचे जज आहेत. ज्याचा एक प्रोमो कलर्स टीव्हीने आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. नीतू कपूर या शोमधून टीव्ही डेब्यू करत आहे. तथापि, ती याआधी टीव्हीवर दिसली आहे परंतु केवळ पाहुणे म्हणून. नीतू पहिल्यांदाच एखाद्या डान्सिंग रिअॅलिटी शोला जज करताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
रणबीर-आलियाचे लग्न झाल्यानंतर नीतू कपूरने सांगितली घरची परिस्थिती, म्हणाली, फक्त सुनेचंच..
आलिया-रणबीरने लग्नात घेतले फक्त ६ वचन, ७ वे वचन घेताना महेश भट्टने रोखले, पंडितालाही झापले
आलियाच्या कलिऱ्यांमध्ये आणि मंगळसुत्रामध्ये दडलाय ‘हा’ खास आकडा, रणबीरशी आहे थेट संबंध
आलियाने लग्नाचा फोटो पोस्ट करताच एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, तुम्हाला..