Share

PHOTO: ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनसाठी विशाखापट्टनमला पोहोचला रणबीर, चाहत्यांनी केले जोरदार स्वागत

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आगामी ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. रणबीर त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विशाखापट्टणमला गेला आहे. येथे चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आपल्या आवडत्या अभिनेत्याला आपल्या शहरात पाहून चाहते खूश झाले. यावेळी रणबीरसोबत दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते एस.एस. राजामौली हेही उपस्थित होते. चाहत्यांनी तिघांचे जल्लोषात स्वागत केले.(Ranbir Kapoor, Brahmastra, Visakhapatnam, Welcome)

रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि एस.एस. राजामौली विमानतळाबाहेर येताच चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सर्वांनी रणबीरचे गुलाबपुष्प आणि हार घालून स्वागत केले. आपल्या सुपरस्टारला पाहून चाहते इतके खूश झाले की त्यांनी त्याच्या नावाचा जयजयकार सुरू केला. रणबीर येथे पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये पोहोचला होता. त्याचा लुक छान दिसत आहे.

रणबीर कपूर, राजामौली आणि अयान मुखर्जी ओपन कारमधून शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसले. यावेळी मोठ्या संख्येने चाहते त्यांच्यासोबत होते. इतकंच नाही तर रोड शोदरम्यान रणबीरचं भव्य फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आलं. क्रेनच्या सहाय्याने ही फुलांची माळ नेत्रदीपक पद्धतीने घातली गेली.

व्हिडिओमध्ये, अभिनेता रणबीर कपूर एसएस राजामौली आणि अयान मुखर्जी यांच्यासह विशाखापट्टणम विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे तेव्हा चाहते त्याच्यावर फुलांचा वर्षाव करतात. पण काही सेकंदातच तिथे उपस्थित असलेला एक चाहता रणबीर कपूरला गुलाबाच फूल देण्यासाठी गर्दीतून पुढे जातो, तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चाहत्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अभिनेत्याने त्या चाहत्याच फुल घेऊन अभिवादन केलं.

रणबीरचाही उत्साह पाहायला पाहण्यासारखा होता. त्याने चाहत्यांना निराश केले नाही आणि त्यांना मन-मोकळेपणाने भेटताना दिसला. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ‘ब्रह्मास्त्र’च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, ‘आज ‘ब्रह्मास्त्र’ बद्दल एक खास घोषणा होणार आहे, कनेक्टेड रहा.

https://www.instagram.com/p/CeNMe-wvCNv/?utm_source=ig_web_copy_link

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या दोघांची जोडी पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जीच्या या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय आणि डिंपल कपाडिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

महत्वाच्या बातम्या-
अखेर ठरलं! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बांधणार लग्नगाठ? या ठिकाणी होणार थाटामाटात लग्न
रणबीर कपूरनंतर आता बहिण करिश्मा कपूरचं होणार लग्न? या फोटोमुळे सुरु झाली चर्चा
रणबीर कपूरला लग्नात सासूकडून मिळाले तब्बल एवढ्या कोटींचे गिफ्ट, किंमत वाचून डोळे होतील पांढरे
रणबीर कपूरने आपल्या लग्नात एक्स गर्लफ्रेंड कतरिनाला केले कॉपी, हा आहे पुरावा, पहा फोटो

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now