लग्न होताच रणबीर-आलिया पोहचले जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला? वाचा व्हायरल फोटोमागील सत्य

महाराष्ट्रात नवीन जोडप्याचे लग्न झाले की त्याला सर्वात पहिल्यांदा खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीला पाठवण्यात येते. आता नुकतेच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचे लग्न झाले आहे. त्यामुळे हे नवीन जोडपे देखील जेजुरीला गेले असावेत अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा त्यांचा फोटो जेजुरी येथील आहे. या फोटोत रणबीरने आलियाला उचलून घेतले आहे. दोघांच्या अंगावर भंडारा पडलेला दिसत आहे. त्यामुळे खरच हे दोघे जेजुरीच्या मंदिरात गेले असल्याचे वाटत आहे.

मात्र या फोटोला एका चाहत्याने एडिट केले आहे. खूपच सुंदर पद्धतीने आलिया आणि रणबीरला खंडेरायाच्या मंदिरात दाखवण्यात आले आहे. आलिया आणि रणबीरचे लग्न झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड मीम्स व्हायरल होत आहेत. यातीलच हे एक मीम्स आहे.

या मीम्सला चाहत्यांनी प्रचंड पसंती दाखवली आहे. यापूर्वी कतरीना कैफ आणि विकी कौशलचा देखील सेम असाच फोटो व्हायरल झाला होता. इतकेच नव्हे तर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे देखील सेम अशाच पद्धतीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

दरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 14 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाला बॉलिवूडमधील खूप खास कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. आपल्या लग्नात आलिया भट खूपच सुंदर आणि गोड दिसत होती. सध्या तिचे हेच फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या
किरीट सोमय्यांचे विरोधकांवरील आरोप कायमचे थाबंणार? खुद्द कोर्टानेच दिले ‘हे’ आदेश
‘गाढव तुरुंगात जाताच लालपरी मुक्त झाली’, सामनाच्या अग्रलेखातून सदावर्ते यांच्यावर टीका
राज्यातील मंत्र्यांचा अजब कारभार! खाजगी रुग्णालयात घेतले उपचार, बिलांची वसुली मात्र सरकारी तिजोरीतून
दंगलखोर समाजाचे नाव सर्वांनाच माहिती आहे, हिंदू कधी दंगल करत नाही; ‘या’ क्रिडापटूचे वादग्रस्त वक्तव्य