Share

Cheetah : २५० दरोडे आणि ७० खून करणारा डाकू बनला ’चित्ता मित्र’; उचलला चित्त्यांच्या सुरक्षेचा विडा

Ramesh Singh Sikarwar

Cheetah : ७० वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेला चित्ता अखेर आज पुन्हा परतला आहे. आफ्रिकेतील नामिबिया देशातून आठ चित्ते भारतात आणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे निमित्त साधत हे चित्ते विमानाने आणण्यात आले आहेत.

भारतातून १९५२ मध्ये चित्ता नावाचा प्राणी नामशेष झाला होता. त्यानंतर जवळपास ७० वर्षांनी आज भारतात चित्ते आणण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये हे चिते आणण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली होती.

त्यानंतर यावर्षी देशात त्यांचे आगमन झाले आहे. भारत सरकारने या चित्त्याच्या प्रोजेक्टसाठी सुमारे ९० ते ९२ कोटी खर्च केले असल्याचे बोलले जात आहे. त्यांना आण्यासाठी विशेष विमाने तयार केली गेली होती. तसेच पुढील पाच वर्षांमध्ये आणखी ५० चित्ते आणण्याचा सरकारचा प्लॅन आहे.

या पार्श्वभूमीवर एकेकाळी दरोडेखोर असलेले रमेश सिंग सिकरवार यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ते लोकांना आफ्रिकेतून आणलेल्या ८ चित्त्यांचे महत्व पटवून देत आहेत. तसेच चित्त्यांबाबत लोकांमध्ये जनजागृतीही करत आहेत.

रमेश सिंग सिकरवार हे ७२ वर्षांचे आहेत. १९७० ते १९८० च्या काळात ते मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यात राज्य करत होते. त्यांच्यावर जवळपास २५० च्या वर दरोडे तर ७० पेक्षाही जास्त खुनाचे गुन्हे दाखल आहेत. १९८४ मध्ये त्यांनी त्यांच्या ३२ सहकाऱ्यांना सोबत घेऊन आत्मसमर्पण केले होते.

तेव्हापासून ते समाजसेवा करत आहेत. ते आठ वर्षे तुरुंगात होते. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी गुन्हेगारीकडे पाठ फिरवत समाजसेवा सुरु केली. तसेच आता ते आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आजूबाजूच्या गावांमध्ये चित्त्याविषयी जनजागृती निर्माण करत आहेत.

रमेश सिंग सिकरवार यांनी सांगितले की, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना चित्त्यांबाबत जनजागृती करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्यास सांगितले. त्यांनतर आता ते ‘चित्ता मित्र’ बनले आहेत. ते बोलताना म्हणाले, “मी लोकांना सांगत आहे की, चित्ता कधीच माणसावर हल्ला करत नाही. त्यामुळे तो जंगलातून बाहेर आला तर न घाबरता आपल्या जवळच्या वन अधिकाऱ्यांना कळवावे,” असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
Narendra Modi : “पंतप्रधान मोदींना त्यांचे मित्र गौतम अदानींना जगात पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बनवायचे आहे”
Narendra Modi: सगळा देश मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय पण चर्चा मात्र शिंदेंच्या शुभेच्छांचीच; कारण…
dhananjay munde : ‘भाजपकडे १२० आमदार असूनही…,’ धनंजय मुंडेंनी शेलक्या शब्दात फडणवीसांना झापलं
Chandrakant Khaire : “आम्ही क्रांती केली म्हणून खैरेंना महत्व आले, यापूर्वी त्यांना मातोश्रीवर प्रवेशही मिळत नव्हता “

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now