Rituja Latke : अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या पोटनिवडणुकीत शिंदे गट आणि भाजप विरुद्ध ठाकरे असा छुपा संघर्ष जनतेनेला पाहायला मिळाला. तशी उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. कारण दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंचा मुंबई महापालिकेतील नोकरीचा राजीनामा स्वीकारण्याबाबत प्रशासन टाळाटाळ करत होते. त्यामुळे ऋतुजा लटके या उमेदवारी अर्ज भरतील का? यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
यावर उद्धव ठाकरे गटाने यामागे भाजप आणि शिंदे गटाचे षडयंत्र असल्याचे म्हणले. अधिकाऱ्यांवर सरकार दबाव आणत असल्याचा घणाघाती आरोपही यावेळी उद्धव ठाकरे गटाने केला. मात्र हायकोर्टाने दणका दिल्यानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून स्वीकारण्यात आला. त्यानंतर ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज निवडणूक कार्यालयात गेल्या.
याप्रसंगी रमेश लटके यांचे वडील कोंडीराम लटके माध्यमांशी संवाद साधताना भावनिक झाल्याचे दिसले. आपली सून अर्ज भरण्यासाठी जाताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. ते माध्यमांसमोर म्हणाले की, ‘ऋतुजा लटके ही रमेश लटके या नावासाठी उभी राहणार आहे, पैशांसाठी नाही.’
‘जनतेनेच तिला उभं केलंय. तिच्या पतीने लोकांसाठी जे काम केलं. पुढे ती तेच काम जनतेसाठी करून दाखवावं, अशाप्रकारे आपल्या सुनेवर विश्वास व्यक्त करताना ते दिसून आले. आता यापुढे जे काही करायचं. ते जनतेच्या हातात आहे,’ असंही रमेश लटकेंचे वडील यावेळी म्हणाले.
दरम्यान ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत नोकरीस होत्या. निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी आपला राजीनामा महापालिकेला दिला. मात्र तो स्वीकारण्यात विलंब होत असल्याने त्यांनी मुंबई हायकोर्टाकडे धाव घेतली. यादरम्यान ऋतुजा लटके यांनी ‘आपण आणि आपले दिवंगत पती हे मातोश्रीचे निष्ठावान आहेत. तसेच मी मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवेल,’ अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास महापालिका विलंब करत असल्याने मोठी गोंधळाची परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या गटात निर्माण झाली होती. ठाकरे गटाची याबाबत संशयाची सुई शिंदे गट आणि भाजपकडे गेली. भाजपने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच मुंबई हायकोर्टाने ऋतुजा लटके यांच्या याचिकेची तातडीने दखल घेत महापालिकेला राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिला. व त्यामुळेच ऋतुजा लटके यांचा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग सुकर झाला.
महत्वाच्या बातम्या-
Krupal tumane : सरकारी जमिनीवर कब्जा करून केलं बेकायदेशीर बांधकाम, शिंदे गटाच्या खासदाराला नोटीस
Sanjay raut : उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का; संजय राऊतांच्या जवळचा खास माणूसच गेला शिंदे गटात
shinde group : शरद पवारांना धोका..! जिल्हाप्रमुखच मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, दिली ‘ही’ मोठी जबाबदारी