ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (ramesh deo) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. चारच दिवसांपूर्वी ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. (ramesh deo passes away at the age of 93)
अभिनेते रमेश देव यांनी आपली पूर्ण हयात सिनेमा आणि अभिनयाला समर्पित केली होती. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी 1962 मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ यांच्यासोबत लग्न केलं होतं.
या वर्षी रमेश देव आणि सीमा देव हे कपल आपल्या लग्नाचे 59 वर्षे पूर्ण करणार होतं. मात्र रमेश देव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांसन मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
तसेच देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘भाग्य लक्ष्मी’ या चित्रपटांत काम केले. त्यांनी “दस लाख” (१९६६) चित्रपटात मनोहरची भूमिका केली होती. देव यांना ‘मुजर्मि’, ‘खिलोना’ आणि ‘जीवन मृत्यु’ या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली.
दरम्यान, देव मूळचे राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. मात्र त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापूर येथे झाला होता. ते राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव “देव’ झाले. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले.
महत्त्वाच्या बातम्या
नितेश राणेंना दणका! कोर्टानं दोन दिवसांची सुनावली पोलीस कोठडी; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
कोरोनातून बरे झाल्यावर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थाचे सेवन नाहीतर होतील गंभीर परीणाम
लग्नात वधूला मिळाले असे गिफ्ट की पाहून सगळेच झाले अवाक, व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल
अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाले, मी राजीनामा दिला कारण…