ramdas kadam : शिंदे गटातील नेते रामदास कदम हे सध्या चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नुकतच रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांविरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून कदम यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलने केली.
राज्यात कदम यांच्या विरोधात शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झालेले असतानाच अखेर कदम यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. ‘रश्मी ठाकरेंबद्दल मी तसं बोलायला नको होतं, मी माझे शब्द मागे घेतो, मी अनवधानाने बोलून गेलो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला,’ अशी कबुली अखेर कदम यांनी दिली.
त्याचं झालं असं की, रत्नागिरीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांना लक्ष केलं. यावेळी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी माँसाहेब यांचा उल्लेख कदम यांनी केला. माँसाहेब कधीही कोणत्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या, मग रश्मी ठाकरे का दिसतात? अशी विचारणा रामदास कदम यांनी केली.
रामदास कदम म्हणाले होते की, “आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं,” “कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच,” अशी खोचक टीका यावेळी कदम यांनी केली होती. त्यानंतर राज्यात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
अखेर कदम यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘शिवसेनेच्या आंदोलनाला मी भीक घालत नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. स्वत:ला बाळासाहेबांचा मुलगा म्हणता मग बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा मुद्दा का घेऊन जात नाही? पवारांशी युती का करता? असं मला म्हणायचं होतं, असं कदम म्हणाले.
दरम्यान, मी वास्तव ते बोललो, ठाकरेंचा अपमान होईल असं काही बोललो नाही, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं रामदास कदम म्हणाले. एक गोष्ट मी बोलायला नको होती, ती म्हणजे रश्मी वहिनी स्टेजवर कशासाठी. हे माझ्याकडून बोलून गेलं हे मान्य. हे बोलण्याची आवश्यकता नव्हती, अशी कबुली कदम यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!