Share

sanjay raut : “कर्नाटक पोलिसांनी अटक केली तरी मी घाबरलो नाही, पण साधी नोटीस येताच तुमची पँट पिवळी झाली”

Sanjay Raut

ramdas kadam on sanjay raut  | महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंगळवारी बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या दगडफेकीमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. अशात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कर्नाटक न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यानंतर ठाकरे गटावर भाजपसह शिंदे गटातील नेतेही टीका करताना दिसून येत आहे.

आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. तुम्हाला बेळगावची एक नोटीस आली तर तुमची पँट पिवळी झाली, असा जोरदार टोला रामदास कदम यांनी संजय राऊतांना लगावला आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावावरुन आता ठाकरे गट-शिंदे गटच एकमेकांना भिडताना दिसून येत आहे.

मला बेळगावमध्ये अटक झाली होती, तेव्हा पण मी घाबरलो नव्हतो, पण तुम्हाला एक नोटीस आली आणि तुमची तर पँटच पिवळी झाली, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद बाजूला सोडून शिंदे गटातील नेते ठाकरे गटातील नेत्यांवरच टीका करताना दिसून येत आहे.

तुम्ही फक्त बोलता, पण शिंदे सत्तेत आल्यापासून त्यांनी किती निर्णय घेतले हे तुम्ही बघत नाही. शिंदे आणि फडणवीस हे सख्ख्या भावासारखे आहे. त्यामुळे टीका करताना संजय राऊतांनी जपून टीका करावी, असा टोलाही रामदास कदम यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

दरम्यान, मंगळवारी बेळगाव-हिरेबागवाडी येथे महाराष्ट्राची पासिंग असलेल्या ६ ट्रकांना लक्ष्य केले गेले. हे ट्रक पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली होती. इतकंच नाहीतर हे ट्रक थांबवून त्यावर दगडफेक सुद्धा केली. त्यामुळे हा वाद वाढला असून शिंदे सरकारवर या वादवरुन टीका केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूमुळे भारताचा स्वीकारावा लागला पराभव, बांगलादेशविरुद्ध ठरला सर्वात मोठा खलनायक
सिंह जखमी असला तरी शिकार करायला विसरला नाही; जखमी रोहितची तुफानी फलंदाजी, सोशल मिडीयावर कौतुकाचा वर्षाव
india : श्वास रोखून धरायला लावणाऱ्या हायहोल्टेज सामन्यात भारताचा पराभव; जखमी रोहीत वाघासारखा लढला

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now