ramdas athavale shocking statement on uddav thackeray | शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतले आहे. तसेच त्यांनी आपले चिन्ह मशाल असे घेतले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव घेतले आहे. तसेच त्यांचे चिन्ह हे ढाल आणि तलवार असे आहे.
उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळाल्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा होत आहे. अनेक राजकीय नेते त्यांच्यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवणयाचे काम करणार आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
अंधेरी पुर्व पोटनिवडणूकीत आमचा पुर्णपणे भाजपला पाठिंबा आहे. या निवडणूकीत भाजपचा उमेदवार १०० टक्के निवडणून येईल. उद्धव ठाकरे यांची मशाल जरी पेटलेली असल्याचे दाखवले जात आहे. पण तरी आम्ही ती विझवण्याचे काम करणार आहे. असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपचं कमळ आम्हाला फुलवायचं आहे. तर मशाल विझवायची आहे. यासाठी रिपब्लिकन पक्ष भाजपच्या पाठिशी आहे. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. कारण आमच्या बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. आमची बाजू मजबूत आहे.
दरम्यान, सध्या सर्वांचे लक्ष हे अंधेरीच्या पोटनिवडणूकीकडे लागलेले आहे. या निवडणूकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेची आणि भाजप यांच्यात महत्वाची निवडणूक होणार आहे. पण या निवडणूकीत ठाकरे गटाचा उमेदवार जिंकण्याची जास्त शक्यता आहे. कारण या मतदार संघाचे आधीचे आमदार हे रमेश लटके होते. आता त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ऋतुजा यांचा निवडणूक अर्ज भरण्यास अडचणी येत होत्या. कारण त्या महापालिकेच्या कर्मचारी होत्या. त्यांनी राजीनामाही दिला होता. पण तरीही त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Disha Vakani: दयाबेनला खरंच कॅन्सर झालाय का? आता भावानेच केला खुलासा, म्हणाला, तिने शो सोडल्यापासून..
Sajid Khan: ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीचा साजिद खानवर गंभीर आरोप; म्हणाली, मला टॉप वर करून…
VIDEO: छोट्याशा गोष्टीवरून जिममध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी, एकमेकींच्या उपटल्या झिंज्या