Share

२६४ किमी पायी चालत आला रामचरणचा फॅन, दोन गोनी तांळासोबत आणले ‘हे’ खास गिफ्ट

कलाकार हे आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. तर काही चाहतेही कमी नसतात. तेही आपल्या कलाकारावरचे प्रेम दाखवण्यासाठी हटक्या गोष्टी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. अनेकदा यावरच्या बातम्याही समोर येत असतात. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील (South Film Industry) सुपरस्टार्सच्या आणि चाहत्यांच्या प्रेमाबाबत अनेकदा चर्चा होत असतात.(Ram Charan, Southern Film Industry, Chahta, Sitaram Raju Alluri)

सध्या आम्ही राम चरणच्या (Ram Charan) एका चाहत्याबद्दल बोलत आहोत ज्याने आपल्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधला आहे. ‘RRR’ मध्ये सीताराम राजू अल्लुरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने (RRR Star) देखील त्या चाहत्याबद्दल आपले प्रेम व्यक्त केले आहे. सोशल मिडीयावर या स्टारची आणि त्याच्या चाहत्याची जोरदार चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे.

वास्तविक, राम चरणच्या जयराज नावाच्या चाहत्याने त्याला भेटण्यासाठी २६४ किलोमीटरचा प्रवास केला आहे. रंगस्थलम फेम अभिनेत्याच्या या डायहार्ड फॅनने कोणत्याही वाहनाशिवाय केवळ उन्हात पायीच प्रवास केला आहे. तसेच त्याने आपल्या शेतातील धान्याने पोर्ट्रेट बनवून ते फ्रेममध्ये टाकून स्टारला भेट दिली आहे. एवढेच नाही तर या सुपर फॅनने अभिनेत्याला शेतात पिकवलेल्या तांदळाच्या गोणीही भेट दिल्या आहेत.

https://twitter.com/Fukkard/status/1530471317538889728?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530471317538889728%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fentertainment%2Fram-charan-super-fan-walks-264-kms-to-meet-him-and-gifted-him-a-portrait-and-rice-grown-bhojpuri-south-mogi-4287071.html

या चाहत्याचा त्याच्या आवडत्या स्टारसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये RRR स्टार चाहत्यासोबत हसताना दिसत आहे. अभिनेत्याला या चाहत्याची माहिती मिळताच त्याने तात्काळ आपला मौल्यवान वेळ काढून त्याची भेट घेतली आणि त्याच्याशी चर्चा केली.

आपल्या आवडत्या स्टारला भेटून या चाहत्याच्या आनंदाला पारावारा उरला नाही. याच कारणामुळे राम चरण यांना मास हिरो म्हटले जाते, कारण ते नेहमीच त्यांच्या प्रियजनांबद्दल सहानुभूतीशील असतात. याआधीही ते अनेक चाहत्यांना भेटले असून त्यांनी अनेकांना आर्थिक मदतही केली आहे.

जर आपण वर्क फ्रंटबद्दल बोललो तर, राम चरण लवकरच शंकरच्या ‘RC 15’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये कियारा अडवाणी त्याची सहकलाकार असेल. कलाकारांनी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी त्यांनी काही सीक्वेन्सही हाताळले आहेत. तो शेवटचा एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’मध्ये ज्युनियर एनटीआरसोबत आणि कोरतला शिवाच्या ‘आचार्य’मध्ये चिरंजीवीसोबत दिसला होता.

महत्वाच्या बातम्या-
राम चरणच्या अलिशान लाईफस्टाईल पुढे बॉलिवूड सुद्धा पडेल थंड, वर्षाला कमवतो तब्बल ‘इतके’ कोटी  
राम चरणनंतर आता jr. NTR पाळणार दिक्षा नियम, २१ दिवस राहणार अनवाणी, खाणार सात्विक भोजन
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला रामचरणचा हा चित्रपट, डिस्ट्रीब्यूटर्सनी मागितली 50 कोटींची भरपाई
राजामौलींच्या फीसमोर काहीच नव्हती रामचरण आणि Jr NTR ची फी, वाचा कोणाला किती कोटी मिळाले

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now