Share

RRR चित्रपटासाठी रामचरण, ज्युनिअर NTR ने घेतली तब्बल ‘एवढे’ कोटी; वाचून डोळे होतील पांढरे

आगामी चित्रपट आरआरआर (RRR) ची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट अजय देवगन ,ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या बजेट विषयी अधिक चर्चा होत आहे.

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटामधील भव्य सेट्स हे नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधतात. त्यांच्या बाहुबली आणि  ‘बाहुबली- द कन्क्लूजन’ या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड या चित्रपटांनी मोडले. या चित्रपटांचे बजेट जास्त होते.

मात्र, आता ‘आरआरआर’ या चित्रपटाचे बजेट हे बाहुबली या चित्रपटाच्या दोन्ही भागांपेक्षा जास्त असल्याचं बोललं जात आहे. नेमकं हे बजेट किती आहे, आणि यात भूमिका करणाऱ्या कलाकारांनी यासाठी किती फिज घेतली हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

या चित्रपटामध्ये राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. दोघांनीही चित्रपटासाठी तगडी फी वसूल केली आहे. माहितीनुसार, रामचरण याने तब्बल 45 कोटी मानधन घेतलं आहे. तर दुसरीकडे ज्युनिअर एनटीआर याने देखील रामचरण एवढीच म्हणजे 45 कोटी फी घेतली आहे.

चित्रपटात आलिया भट ही सीतेच्या भूमिकेत आहे. आलियाने या चित्रपटात मोजून 20 मिनिटांची भूमिका साकारली आहे. पण या 20 मिनिटांच्या रोलसाठी आलियाने 9 कोटी रुपये फी घेतल्याचे सांगितले जात आहे. तर अजय देवगन याने चित्रपटासाठी केवळ 7 दिवस शूटिंग केलं आणि यासाठी त्याने 35 कोटी मानधन घेतलं आहे. केवळ चित्रपट बनवण्यासाठी आलेला खर्च 400 कोटी एवढा आहे.

चित्रपटाची कथा ब्रिटिश हुकुमशाही आणि हैदराबाद निजामाविरुद्ध लढलेले क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम यांच्याभोवती फिरते. चित्रपटात एनटीआर कोमाराम भीम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेता रामचरण अल्लुरी सीताराम यांची भूमिका साकारत आहे. ‘आर आर आर’ चित्रपटात अनेक मोठे कलाकार आहेत, त्यामुळे त्याचं बजेटही मोठं आहे.

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now