Share

Ram Temple : २०२३ मध्ये बांधकाम पुर्ण झाल्यावर कसे दिसेल भव्य राममंदिर? ट्रस्टने शेअर केले खास फोटो

ram temple

ram temple trust share photo  | अयोध्येतील भव्य राम मंदिराची नेहमीच चर्चा होत असते. रामभक्त या मंदिराचे बांधकाम पुर्ण होण्याची वाट पाहत आहे. राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराचे बांधकाम सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

अशात मंदिराशी संबंधित काही छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यामध्ये तुम्हाला राम मंदिराची भव्यता पाहायला मिळते. राम मंदिराच्या उभारणीसाठी १८०० कोटी रुपये खर्च होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राम मंदिराचे बांधकाम २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

डिसेंबर २०२३ पर्यंत ते तयार होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी २०२४ पर्यंत (मकर संक्रांती) राम मंदिरात प्रभू रामाच्या प्रतिमेची पूजा केली जाईल अशी अपेक्षा आहे. राम मंदिराच्या उभारणीसोबतच अयोध्येच्या सुशोभीकरणाचे कामही सध्या जोऱ्यात सुरु असल्याचे पाहायला मिळते.

temple

रस्त्याचे रुंदीकरण आणि चौकही नव्या पद्धतीने तयार केले जात आहे. अशात रामभक्तांना मंदिर उभारणीच्या प्रगतीची जाणीव व्हावी यासाठी ट्रस्टकडून फोटो जारी करण्यात आले आहेत. ट्रस्टकडून जारी करण्यात आलेले फोटो हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भव्य राम मंदिरात एकूण १२ दरवाजे असणार आहे. हे सर्व दरवाजे सागवान लाकडाचे असतील. जानेवारी २०२४ पासून भाविकांना राममंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे. हे मंदिर भारतातील सर्वात भव्य मंदिर असणार आहे. मंदिराच्या गर्भगृहात १६० खांब बसवण्यात येणार आहेत.

ते १६० खांब या मंदिराचा आधार असणार आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर १३२ खांब असतील. त्याचबरोबर दुसऱ्या मजल्यावर ७४ खांब बसवण्यात येणार आहेत. आतापर्यंत राम मंदिराच्या उभारणीचे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. राम मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या कामासाठी रोज ५०० मजूर काम करत आहे.

महत्वाच्या बातम्या-
shingles : जाणून घ्या नागीण झाल्यावर करता येणारे ‘हे’ घरगुती उपाय, फक्त ५ दिवसांत व्हाल पुर्णपणे बरे
Jyotiraditya Shinde : तब्बल ४०० खोल्या, डायनिंग टेबलवर चांदीची ट्रेन अन्..; ज्योतिरादित्य शिंदेंचा हा राजमहाल एकदा बघाच!
health : सुहागरात्रीला ग्लासभर दूध पिण्याची प्रथा का आहे? यामागचे वैज्ञानिक कारण वाचून आश्चर्य वाटेल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now