ram shinde : ठाकरेंच्या ‘या’ चुकीमुळे सरकार कोसळलं; सत्तांतरानंतर दोन महिन्यांनी भाजप नेत्याने फोडलं गुपित

ram shinde : मुख्यमंत्री पदावरून भाजप – शिवसेनेची युती तुटली अन् राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अनेक राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मिळून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणले. अडीच वर्षांचा कालावधी ठाकरे सरकार व्यवस्थित पूर्ण केला.

मात्र याच अडीच वर्षात भाजपने सत्ताधाऱ्यांना म्हणजेच ठाकरे सरकारमधील नेत्यांना सळू की पळू केले. अखेर एकनाथ शिंदे यांना हाताशी घेऊन भाजपने डाव टाकला. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. अन् राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भूकंप झाला. ठाकरे सरकार बघता – बघता कोसळलं.

40 आमदारांनासोबत घेऊन शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. मात्र अजूनही राज्यातील जनतेला प्रश्न पडले आहेत की नेमकं ठाकरे सरकार कोणामुळे कोसळलं? अशातच भाजपच्या एका बड्या नेत्याने ठाकरे सरकार का कोसळलं? याचे उत्तर दिलं आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते, माजी आमदार राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार पडलं नसतं. मात्र उद्धव ठाकरेंच्या एका गोष्टीमुळे सरकार पडलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मीडियासमोर आले असते तरी सरकार पडलं नसतं, असा दावा शिंदेंनी केला आहे.

दरम्यान, पुढे बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हंटलं आहे की, ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच मंत्रालयात गेले नाहीत. संघटनेची बैठक घेतली नाही. आता सरकार पडल्यानंतर ते खडबडून जागे झाले आहेत. बैठका घ्यायला लागलेत, राज्यात दौरे करू लागलेत.’

तर दुसरीकडे पुढे बोलताना राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस के घोडे आहेत, असं शिंदे म्हणाले आहेत. सध्या राम शिंदे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे सरकारबद्दल केलेल्या वक्तव्यावर अद्याप कोणत्याही नेत्याकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये.