Share

श्रद्धाच्या आत्म्याने यावे आणि आफताबचे ७० तुकडे करावेत; प्रसिद्ध बाॅलीवूड दिग्दर्शकाचे ट्विट चर्चेत

aftab shraddha

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे. या हत्याकांडाशी संबंधित एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी प्रेम, नंतर कबुली आणि नंतर भांडणाची गोष्ट सर्वांनी ऐकली असेल, पण श्रद्धा वालकरच्या बाबतीत हे भांडण असे आहे की, तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावालाने तिची हत्या केल्यानंतर तिचे ३५ तुकडे केले.

पोलिसांनी पकडल्यानंतर आफताब अमीन पूनावालानेही ‘होय मीच तिला मारले’ अशी कबुली दिली. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, श्रद्धा वॉकरच्या निर्घृण हत्येप्रकरणी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

श्रद्धा वॉकरच्या निर्घृण हत्येप्रकरणी सर्वसामान्यांपासून राजकीय किंवा चित्रपट जगतापर्यंत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी आफताब अमीन पूनावाला याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे काहीजण सांगत आहेत. या सगळ्याच्या दरम्यान दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडिया हँडलवरून या प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करत त्यांनी लिहिले की, ‘श्रद्धाने आत्मा म्हणून परत यावे आणि त्याचे ७० तुकडे करावेत.’ याशिवाय आणखी एका ट्विटमध्ये दिग्दर्शक यांनी लिहिले की, ‘केवळ कायद्याच्या भीतीने क्रूर हत्या रोखता येत नाहीत. पण त्या घटनेचा बळी ठरलेल्या व्यक्तीच्या आत्म्यानं परत येऊन मारेकऱ्यांना मारले तर ते नक्कीच हे थांबवता येईल. देवाने याचा विचार करावा आणि आवश्यक ते करावे ही विनंती.’

दरम्यान, याआधी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही तिच्या सोशल मीडिया हँडलवरून श्रद्धा वॉकरच्या निर्घृण हत्येबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तर श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत.

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now