राखी सावंत तिच्या कॉमेडीने सगळ्यांना खूप हसवते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे मजेदार व्हिडिओही शेअर करत असते. आता एक नवीन व्हिडिओ शेअर करून, तिने चाहत्यांना सांगितले आहे की तिला भेट म्हणून एक नवीन बीएमडब्ल्यू कार मिळाली आहे.(rakhi-was-sad-because-she-didnt-have-money-to-buy-a-car-this-person-gave-her-a-new-bmw)
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचे चाहते खूप खूश आहेत, कारण काही महिन्यांपूर्वी राखी एका आलिशान कार शोरूमच्या बाहेर दिसली होती, जेव्हा पापाराझींनी तिला विचारले की ती कार खरेदी करत आहे का? तेव्हा ‘बिग बॉस 15’ स्पर्धकाने सांगितले की तिच्याकडे 50-60 लाख रुपये नाहीत कि ती नवी कार घेवू शकेल!
या व्हिडिओमध्ये लाल रंगाची बीएमडब्ल्यू कार(BMW car) दिसत आहे. त्यावर केकही ठेवला आहे. राखी(Rakhi Sawant) ज्यांनी गाडी भेट दिली त्यांच्यासोबत केक कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत राखीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझी नवीन गिफ्टेड कार.’ यासोबतच तिने हार्ट इमोजीही ठेवला आहे.
कॉमेडियन कृष्णा अभिषेकची(Krishna Abhishek) पत्नी काश्मीर शाहनेही या व्हिडिओवर कमेंट करत राखी सावंतचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर चाहतेही तिच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये राखी एका आलिशान कार शोरूमबाहेर दिसली होती. तेव्हा राखीने सांगितले होते की, ती फक्त कार पाहण्यासाठी गेली होती, कारण तिला वाटले होते की कोरोनाच्या काळात कार स्वस्त झाली असेल. नवीन कार घेण्यासाठी 60 लाख रुपये नसल्यामुळे जुनी लाल कार तिच्यासाठी ठीक आहे, असेही तिने सांगितले.
काही दिवसांपूर्वी आरआरआरच्या(RRR) सक्सेस पार्टीमध्ये राखी दिसली होती. तिने राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत व्हिडिओही बनवला. मात्र, करण जोहरकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने राखीच्या चाहत्यांनी चित्रपट निर्मात्याला ट्रोल केले. पण राखीने नंतर सांगितले की ती ज्युनियर एनटीआरशी बोलण्यात व्यस्त होती, त्यामुळे ती लगेच प्रतिक्रिया देऊ शकली नाही.