Sonali Phogat, Rakhi Sawant, Big Boss/ भाजप नेत्या आणि ‘बिग बॉस’ची (Bigg Boss) माजी स्पर्धक सोनाली फोगटच्या (Sonali Phogat) मृत्यूप्रकरणी राखी सावंतने (Rakhi Sawant) धक्कादायक दावा केला आहे. स्वत:ला सोनालीची जवळची मैत्रिण सांगणाऱ्या राखीने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, सोनालीने तिच्यासमोर कबूल केले होते की, तिला तिचा पीए सुधीर सांगवान आवडतो. सुधीरने सोनालीशी जे केले, ते चांगले केले नाही, असेही ती म्हणाली.
मीडियाशी संवाद साधताना राखी सावंत म्हणाली, पहिल्या दिवसापासून मला वाटत होतं की हा खून आहे. मी ‘बिग बॉस’मध्ये तिच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. सोनालीची मुलगी हीच तिचा जीव की प्राण आहे. तिचा पीए होता ना तो टकलू (सुधीर सांगवान), सोनाली म्हणायची की तिचे त्याच्यावर प्रेम आहे. तो PA सुद्धा होता आणि मित्रही होता. आता ती (सोनाली) नसल्यामुळे मला काहीही सांगायलाही आवडत नाही आणि ते खूप चुकीच आहे. तिला हृदयविकाराचा झटका आला नाही. आता नक्की काय मुद्दा आहे, ते सीबीआय आणि पोलिसांना पाहू द्या.
सोनालीच्या व्हायरल व्हिडीओवर राखी पुढे म्हणाली, मी तो व्हिडिओ पाहिला, तिचे कपडे देखील काढण्यात आले होते. मला धक्काच बसला होता, पण मी त्यावेळी दुबईत होते. ती तिच्या मुलीवर सर्वात जास्त प्रेम करत होती. मी ट्रॉमामध्ये होते, डिप्रेशनमध्ये होते. तिचे तिच्या पक्षावर प्रेम होते. तिच्या मारेकर्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे मी भाजपला आवाहन करते.
राखी पुढे म्हणाली, त्या टकल्याने (सुधीर सांगवान) तिच्या मुलीला अनाथ केले. मला पहिल्यापासूनच त्याच्यावर संशय होता. मी त्याला 10 वेळा भेटले आहे. त्याला पाहून मला त्या टाकल्याचा खूप राग यायचा. मी सोनाली फोगटला विचारले की हा कोण आहे तर ती म्हणाली की माझा PA आहे आणि आम्ही एकमेकांना पसंद करत आहोत. त्याच्या दिसण्यावरून मला तो गुन्हेगार वाटायचा आणि आज बघता बघता ते खरे ठरले. मी खूप दुःखी आहे. माझी त्या महिलेला आणि तिच्या मुलीला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे.
व्यवसायाने सोशल मीडिया स्टार असलेल्या सोनाली फोगटचे 23 ऑगस्ट रोजी गोव्यात निधन झाले. आधी हा हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात होते, पण नंतर जेव्हा सोनालीच्या भावाने पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला तेव्हा तपासात उघड झाले की तिला जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले होते, त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती.
अटकेनंतर सुधीर सांगवान याने गुन्ह्याची कबुली दिली. सोशल मीडियावर काही व्हिडिओही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये सुधीर सोनालीला जबरदस्तीने दारू पाजत होता आणि काहींमध्ये तो तिला बाथरूमच्या दिशेने घेऊन जात होता. पोलीस या प्रकरणाचा खुनाच्या कोनातून तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Sonali Phogat: सोनाली फोगट यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, शरीरावर जबरदस्तीने…
Sonali Phogat: वॉशरूममध्ये सोनाली फोगटसोबत २ तास होते हे दोन व्यक्ती, त्या १२० मिनिटांत काय झालं?
Sonali Phogat : सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण, आणखी दोन जणांना अटक, धक्कादायक माहिती आली समोर