ड्रामा क्विन अभिनेत्री राखी सावंत नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लुकमुळे, तिच्या वक्तव्याने, चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या विषयी असणारी कोणतीही गोष्ट अतिशय वेगात व्हायरल होत असते. तिचे मजेशीर व्हिडीओ पाहून चाहते देखील खुश होतात. असाच तिचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत येत आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
राखीने तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे राखीच्या डान्सचा. त्यात तिने अंगाला भांडी चिकटवत डान्स केला आहे. तिचा हा लुक पाहून चाहते देखील पोट धरून हसू लागले आहेत. तिचा हा अजब गजब व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे.
या व्हिडीओ मध्ये राखी सावंत बेली डान्स करत आहे. तिच्या डोक्यात कढई, छातीला डबे, हातात चमचा, कमरेवर किसणी आहे. अशा अवस्थेत ती भांड्यांसोबत डान्स करत आहे. तिच्या या विचित्र डान्स वरती लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. ‘खरच जगापेक्षा वेगळा प्राणी आहे’, म्हणत काहींनी तिला कमेंट केल्या आहेत.
हा डान्सचा व्हिडीओ शेअर करत राखी आपल्या चाहत्यांना म्हणते की, तुम्ही म्हणत असाल की हे मी काय घातलंय? तर हा व्हिडिओ बघा. तर मी तुम्हाला बेले डान्स शिकवणार आहे. त्यानंतर तिने अंगावरची भांडी वाजवत डान्स कसा करायचा हे सांगितले आहे. तिने या व्हिडिओवर स्वतः च हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
राखीचा याआधी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ओ आन्टा वा गाण्यावरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. राखीने एका वेगळ्या अंदाजात या गाण्यावर डान्स केला होता. चाहत्यांना तिचा हा डान्स प्रचंड आवडला होता. तिच्या या डान्सवर चाहत्यांनी तिला अनेक प्रचंड प्रतिसाद दिला होता.
दरम्यान, राखी सावंतने तिचा पती रितेश सोबत घटस्फोट घेतला होता, तेव्हा ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती. तिला तिच्या पतीपासून होणारा त्रास पाहून चाहत्यांनी तिला सहानुभूती दिली होती. तिच्या निर्णयाला तिच्या चाहत्यांनी सपोर्ट केला होता. तिचे चाहते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.