बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नुकतीच ‘बिग बॉस १५’ च्या घरातून बाहेर पडली आहे. राखीने बिग बॉस घरात असण्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मात्र, बिग बॉसच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचून तिला घरातून बाहेर पडावे लागले. मात्र, शोमधून बाहेर पडल्यानंतर ती खूपच भावूक झाली असून बिग बॉसने कायम मनोरंजन करण्यासाठी तिचा वापर केल्याचा आरोप तिने केला (rakhi sawant accuse on bigg boss) आहे.
राखीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याने तिचा राग व्यक्त करत आहे.
राखी म्हणत आहे की, ‘बिग बॉसने हे अजिबात चांगलं केलं नाही. याचा अर्थ असा झाला की, बिग बॉस मला दरवर्षी बोलावणार आणि टिशू पेपरसारखा माझा वापर करणार. पण मी काही टिशू पेपर नाही बिग बॉस. मी एक जिवंत व्यक्ती आहे. मी ती व्यक्ती नाही जिचा वापर तुम्ही मनोरंजनासाठी कराल’.
यावेळी राखी बिग बॉसच्या घराबाबत बोलताना थोडीशी भावूकही झाली. तिने म्हटले की, ‘मी कोणतंही संत्रा, लिंबू नाही की, रस निघेपर्यंत पिळून घ्या आणि त्यानंतर साल फेकून द्या. तुम्ही माझ्याकडून मनोरंजन करून घ्याल आणि फिनालेच्या वेळी दुसऱ्याच कोणाला घेऊन जाल’.
राखीने पुढे म्हटले की, ‘बिग बॉसवर माझं किती प्रेम आहे हे त्यांनाही माहित आहे. पण मी ट्रॉफीची दावेदार होती आणि ट्रॉफी मिळवण्यासाठी मी हक्कदार होते. यानंतर राखी भावूक होऊन तिच्या डोळ्यातून अश्रूही वाहायला लागल्याचे व्हिडिओत दिसत आहे. राखीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, राखी सावंत वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर फिनाले वीकमध्ये सहभागी होणारी आणि वीआयपी सदस्यता मिळवणारी पहिली अभिनेत्री होती. पण शेवटच्या वीकमध्ये पोहोचून ती घरातून बाहेर पडली. यापूर्वी राखी ‘बिग बॉस’ शोच्या १४ व्या सीझनमध्येही दिसली होती. त्यावेळीही ती फिनालेपर्यंत पोहोचली होती. मात्र, फिनालेच्या वेळी तिला घराबाहेर पडावं लागलं.
महत्त्वाच्या बातम्या :
प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच…! ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट
श्वेता तिवारीचे वादग्रस्त वक्तव्य; अंडरगारमेंटला देवाशी जोडले, म्हणाली, ‘देव माझ्या ब्रा ची…’
..त्यामुळे अभिनय सोडून बॉबी देओलला करावे लागले नाईट क्लबमध्ये काम, कठीण काळात पत्नीने दिली साथ






