Rakesh Jhunjunwala: राकेश झुनझुनवालांचा गुंतवणूकीचा ‘हा’ सल्ला सर्वांनी ऐकलाच पाहीजे; आनंद महिंद्राचे आवाहन

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjunwala)भारतातील गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर्स. ज्यांना भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल आणि भारताचा वॉरेन बफे असेही संबोधले जात होते. ते राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सगळ्यांना धक्का बसला होता.

झुनझुनवाला हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर होते. पाच हजार रुपयांच्या भांडवलाने सुरुवात करून, सुमारे ४६,००० कोटी रुपयांच्या संपत्तीपर्यंत झुनझुनवाला पोहचले होते. त्यांना आरोग्यासंदर्भातील बऱ्याच समस्या होत्या. १४ ऑगस्ट रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईत राहत्या घरी निधन झाले.

झुनझुनवाला यांच्या निधनाला एक आठवडा पूर्ण झाला तरीही ते चर्चेत आहेत. त्यांचे किस्से सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात दिसत आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्याबाबतीत रविवारी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे आनंद महिंद्रांनी, एक पोस्ट केली आहे. “राकेशने दिलेला गुंतवणूकीचा सर्वोत्तम सल्ला” असे म्हणून पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट काही वर्षांपूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी इकनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमधील आहे.

आनंद महिंद्रा म्हणाले की, राकेशने गुंतवणुकीबाबतचा सगळ्यात फायदेशीर ठरणारा सल्ला दिला आहे. सर्वांनी या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करायला हवी. कोट्यवधी रुपयाचा हा सल्ला आहे. महत्वाचं म्हणजे यात पैशाची गुंतवणूक करायची नाही तर वेळेची गुंतवणूक करायची आहे.

झुनझुनवालांनी दिलेला सल्ला काय?
“माझी सर्वांत वाईट गुंतवणूक ही माझ्या आरोग्याबाबतीतील होती. मी सर्वांना या गोष्टीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करावी असा सल्ला देईन,” असं राकेश झुनझुनवाला इकनॉमिक टाइम्सला मुलाखत देताना म्हणाले होते. यावरून अंदाज वर्तवत इतका श्रीमंत असणारा व्यक्ती आपल्या आरोग्याबद्दल समाधानी नाही.

म्हणून ते इतरांना आरोग्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असल्याचे एका लेखामध्ये लिहण्यात आले होते. याबाबतचा स्क्रीनशॉट आनंद महिंद्रांनी पोस्ट केलेला आहे. स्क्रीनशॉटमधील लेख २३ डिसेंबर २०१९ चा असल्याचं स्पष्ट होत आहे.

महत्वाच्या बातम्या
Aamir Khan: चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिरला धक्क्यावर धक्के, आता Netflix सोबतची ‘ही’ डीलही झाली कॅन्सल
व्यावसायिकाचं महिलेसोबत जुळलं सूत, युरोपला हनिमूनला गेले पण आल्यावर जे झालं ते भयंकर होतं
security : देशाच्या सुरक्षेलाच नख, मोठा घोटाळा उघड; अनेक बडे अधिकारी अडकणार
security : देशाच्या सुरक्षेलाच नख, मोठा घोटाळा उघड; अनेक बडे अधिकारी अडकणार