Share

सहा महिन्यात ३० टक्क्यांनी वधारला राकेश झुनझुनवालांचा हा आवडता शेअर, गुंतवणूकदारही मालामाल

बिग बुल (Big Bull) म्हणून प्रसिद्ध असलेले दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या टायटन कंपनीचे शेअर्स गुरुवारी बीएसई ट्रेडिंगदरम्यान पाच टक्क्यांनी वाढून विक्रमी रु. 2,718.65 वर गेले. त्याचा पूर्वीचा सर्वकालीन उच्चांक रु 2,687.30 होता, जो 7 जानेवारी 2022 रोजी पोहोचला होता.(Rakesh Jhunjhunwala’s favorite stock rises 30% in six months)

झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबाच्या पोर्टफोलिओमधील हा सर्वात मोठा स्टॉक आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य 12,000 कोटी रुपये आहे. 31 डिसेंबरपर्यंत झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीत 4.02 टक्के आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 1.07 टक्के हिस्सा आहे.

दोघांची मिळून टायटनमध्ये 5.09 टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीचे मार्केट कॅप 2.38 लाख कोटी रुपये आहे आणि या संदर्भात झुनझुनवाला दाम्पत्याच्या शेअरची किंमत 12,187 कोटी रुपये आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअर सुमारे 30 टक्क्यांनी वधारला आहे, तर बीएसई सेन्सेक्स या काळात जवळपास दोन टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या एका वर्षात तो सुमारे 85 टक्क्यांनी वाढला आहे, तर बेंचमार्क निर्देशांक या काळात 16 टक्क्यांनी वाढला आहे.

कंपनीचा एकत्रित नफा आर्थिक वर्ष 22 च्या पहिल्या नऊ महिन्यांत वार्षिक 312 टक्क्यांनी वाढून 1,671 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत महसूलही 48 टक्क्यांनी वाढून 20,150 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ब्रोकरेज फर्मने ‘bull case’ प्राइस टारगेट 783 रुपये ठेवले आहे. त्यानुसार शेअरमध्ये 57 टक्के तेजी येण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा मोटर्सला होईल, असे जेपी मॉर्गनचे मत आहे, त्यामुळे हे लक्ष्य गाठणे अवघड नाही. जग्वार लँड रोव्हरचे 2039 पर्यंत पुरवठा साखळी, उत्पादने आणि ऑपरेशन्समध्ये निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढच्या पिढीतील कार ऑटोमोटिव्हला सर्वात मोठ्या आणि प्रगत तंत्रज्ञान उद्योगात बदलतील, Nvidia चे संस्थापक आणि CEO जेन्सेन हुआंग म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-
विमानतळावर IPS अधिकाऱ्याच्या बॅगेतून निघाल्या वाटाण्याच्या शेंगा; लोकं म्हणाले, वाटाणा स्मगलिंग सुरू आहे
हरभजन सिंह होणार AAP चा राज्यसभा उमेदवार, सांभाळू शकतो मोठी जबाबदारी
आकाश को कोई सीमा नहीं, सिद्धू के पास अब कोई काम नही, अभिनेत्याने उडवली खिल्ली
नवजात मुलीसाठी लेडी डॉक्टर बनली देवदूत, तब्बल सात मिनीटं तोंडाने श्वास देऊन वाचवला जीव 

 

आर्थिक ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now