Share

राकेश झुनझुनवालांचे बॉलिवूडशी होते जुने नाते, ‘या’ हिट चित्रपटांची केली होती निर्मिती

शेअर मार्केटवर निर्विवाद वर्चस्व असलेले देशातील मोठे गुंतवणूकदार, इंडियाचे बिग बुल म्हणवणारे राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. झुनझुनवाला यांचा निधनावर देशातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला. आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठं साम्राज्य उभे करणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे मनोरंजन क्षेत्राशी वेगळे नाते आहे. (Rakesh Jhunjhunwala had an old relationship with Bollywood)

५ हजारपासून सुरुवात करत ४० हजार कोटींचं साम्राज्य उभे करणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांना सर्व क्षेत्रात आदर होता. झुनझुनवाला यांचे बॉलीवूडची देखील चांगले संबंध होते. २०१९ मध्ये त्यांनी हंगामा डिजिटल मीडिया नावाची एंटरटेनमेंट कंपनी सुरू केली.

नंतरच्या काळात या कंपनीचे नाव बदलून हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, असे करण्यात आले. याही पुढे जात राकेश झुनझुनवाला यांनी बॉलीवूडच्या अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.

फार कमी लोकांना हे माहीत असेल, परंतु २०१२ साली ज्या चित्रपटातून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीने पुन्हा ज्या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. त्या इंग्लिश विंग्लिश सिनेमाची निर्मिती राकेश झुनझुनवाला यांनीच केली होती.

श्रीदेवीसाठी अत्यंत महत्त्वाचा हा चित्रपट मानला जातो. कारण या चित्रपटातून तिने आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली होती. गौरी शिंदेने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सुपरहिट झाला. व परदेशात सुद्धा प्रचंड प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला.

करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘की अँड का’ हा सिनेमा देखील राकेश झुनझुनवाला यांची निर्मिती होती. २०१६ ला आलेल्या या सिनेमाने वेगळाच हटके विषय प्रेक्षकांसमोर मांडला. ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अशाप्रकारे वेगळ्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवणारे राकेश झुनझुनवाला वेगळेच व्यक्तिमत्व होते.

महत्वाच्या बातम्या-
विनायक मेटे अपघात प्रकरणात पोलिसांनी ‘या’ व्यक्तीला घेतले ताब्यात, चौकशीतुन अपघाताचे कारण येणार समोर
..त्यामुळे राकेश झुनझुनवालांना झाले होते अनेक गंभीर आजार, स्वतःच सांगितले होते कारण
Sameer wankhede : मोठी बातमी! जात पडताळणी समितीकडून समीर वानखेडेंना क्लीन चीट, मलिक पडले तोंडघशी

ताज्या बातम्या आर्थिक बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now