राकेश बापटने शमिता शेट्टीसोबत शेअर केला रोमॅंटिक व्हिडीओ, एक्स-वाइफने केली अशी कमेंट

काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो सुरू झाला होता. हा शो दिव्या अग्रवालने जिंकला होता. याच दरम्यान शमिता शेट्टी आणि राकेश बापट देखील या शोचा एक भाग होते. याच दरम्यान या दोघांची मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हा शो संपल्यानंतर ही हे दोघे अनेक वेळा एकत्र दिसून आले.

राकेश आणि शमिताचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे होता. हा दिवस खास बनवण्यासाठी दोघेही एकत्र अलिबागला रवाना झाले होते. आता राकेश बापट यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राकेश शमितासोबत एका बोटीत बसला आहे. हे दोघेही समुद्राच्या निळ्याशार वातावरणात एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे राकेशने शेअर केलेल्या या व्हिडिओवर एक्स पत्नीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडिओमध्ये राकेश आणि शमिता एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत. या खास क्षणासाठी शमिता शेट्टीने ऑफ-व्हाइट ड्रेस घातला होता. तर राकेशनेही पांढरा टी-शर्ट, जॅकेट आणि जीन्स घातली होती. या व्हिडिओमध्ये ‘गहराइयां’ या चित्रपटातील ‘तू मर्ज है तू दवा है’ हे गाणे वाजत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे.

अनेक चाहत्यांनी या व्हिडिओला लाईक्ससह प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. इतकेच नव्हे तर राकेश बापटची एक्स पत्नी रिद्धी डोगराने देखील आपल्या प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘तुम्हा दोघांवर असाच आशीर्वाद असो.’ तसेच तिने पुढे नजर न लागो असा दर्शवणारा इमोजी देखील टाकला आहे.

त्याचबरोबर काही चाहत्यांनी या दोघांच्या केमेस्ट्रीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच प्रतिक्रिया डेट लिहिले आहे की, ‘दोघांनाही कोणाची नजर न लागो.’ या व्हिडिओवर लोक जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. राकेश आणि शमितावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याचबरोबर लोक प्रतिक्रिया देत हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, राकेश आणि शमिताच्या प्रेमाचा प्रवास ‘बिग बॉस ओटीटी’ मधून सुरू झाला. त्यानंतर शमिता शेट्टीनेही ‘बिग बॉस १५’ मध्ये प्रवेश केला. याच दरम्यान विशाल कोटियनने जेव्हा राकेश-शमिताच्या नात्याची खिल्ली उडवली तेव्हा रिद्धी डोगराने या दोघांच्या बाजूने उत्तर दिले होते. रिद्धी लिहिले की, ‘प्रेक्षकांनी अशा लोकांना ‘बिग बॉस १५’ मधून लवकरच बाहेर काढावे, जे लोकांच्या पाठीमागे चेष्टा करतात.’