Share

Raju Srivastava’s daughter: आईला बंदूकधारी चोरांपासून वाचवणारी राजू श्रीवास्तव यांची मुलगी आहे खूपच निडर; वाचा थरारक किस्सा

Raju Srivastava’s daughter: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती सुधारावी, यासाठी त्यांचा मित्रपरिवार, मनोरंजन क्षेत्र, त्यांचे कुटुंबीय प्रार्थना करत आहेत. हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे सुद्धा राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत सुधारणा व्हावी म्हणून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची मुलगी अंतरा हिच्याबाबत सध्या एका गोष्टीची चर्चा आहे.

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असताना त्यांची मुलगी अंतरा सगळ्या श्रीवास्तव कुटुंबाचा मोठा आधार बनली आहे. अंतराबाबतच फार लोकांना माहीत नसणारी एक अनसीन स्टोरी आज आपण जाणून घेऊयात.

अंतराला अवघ्या १२ वर्षांची असताना तिला थेट राष्ट्रपतींकडूनर शौर्य पुरस्कार मिळाला होता. घरात घुसलेल्या चोरट्यांपासून आईचे रक्षण करण्याचे धाडस लहानशा अंतराने केल्यामुळे तिला या कामगिरीसाठी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी सन्मानित केले होते.

ती घटना अशी घडली की, एक दिवस अचानक राजू श्रीवास्तव यांच्या घरात चोर शिरले. चोरांनी श्रीवास्तव यांच्या पत्नीच्या डोक्यावर पिस्तूल ताणले. घरातील ऐवज, पैसे चोरण्याचा त्यांचा डाव होता.

त्याचवेळी लहान अंतराने चोरांना बघताच हळूच बेडरूममध्ये जाऊन आपल्या वडिलांना आणि पोलिसांना फोन केला. एवढ्यावरच ती थांबली नाही तर, खिडकीतून घराच्या वॉचमनला इशारा करत पोलिसांना बोलवण्यास सांगितले.

अंतराने दाखवलेल्या चातुर्य आणि धाडसामुळे पोलीस वेळेवर पोहोचले व अंतरा आणि आईची सुखरूप सुटका झाली. यामुळे घरातील मोठी जमापुंजी देखील वाचली. अंतराने दाखवलेल्या या धाडसामुळे तिला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हीच अंतरा आज सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. सध्या ती राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असताना श्रीवास्तव कुटुंबाचा मोठा आधार बनली आहे.

महत्वाच्या बातम्या-
Amitabh Bachchan: ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर गुजरातच्या विमलला देता आले नाही, तुम्हाला माहिती आहे का?
Raju Srivastava: दाऊद इब्राहिमवर विनोद केल्यावर राजू श्रीवास्तवला आल्या होत्या जीवे मारण्याच्या धमक्या, वाचा ‘तो’ किस्सा
CM Eknath Shinde: आनंद दिघेंनी बहीणीजवळ व्यक्त केलेली ‘ती’ इच्छा मी पुर्ण केली; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now