सर्वांना आपल्या उत्तम विनोदाने खळखळून हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त समोर येत आहे. राजू श्रीवास्तव यांना आज सकाळी अचानक हृदयविकाराचा झटका आला. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Raju Srivastava’s condition critical, still in unconscious state)
जिममध्ये वर्कआउट करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला व ते ट्रेडमिलवरच कोसळले. नंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असल्याच्या वृत्ताला त्यांच्या भावाने पण दुजोरा दिला आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. अँजिओग्राफीनंतर पण राजू श्रीवास्तव बेशुद्ध अवस्थेतच आहे.
राजू श्रीवास्तव अजूनही बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे राजू श्रीवास्तव यांचा चाहता वर्ग हादरला. त्यांच्याकडून श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमाद्वारे विचारणा केली जात आहे.
राजू श्रीवास्तव यांना कॉमेडीचे बादशहा म्हंटले जाते. त्यांना लहानपणापासूनच विनोदाची आवड होती. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टँडअप कॉमेडीपासून केली व ते आपल्या विनोदाच्या उत्तम टाइमिंगमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले.
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल कॉमेडियन सुनील पाल यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये त्यांनी राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, असे आवाहन यावेळी चाहत्यांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
१६ एकरवर पंगती, लाखो भाविक, ६४ ट्रॅक्टरमधून प्रसादाचे वाटप, ८ दिवस सुरू होती चूल
Shivsena : “कारकुन, रिक्षावाल्यांना मोठं करणाऱ्या ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतलं तर बिघडलं कुठं?”
jalna : वऱ्हाडी बनून आले अन् 390 कोटींची मालमत्ता केली जप्त, आयकर विभागाची धडक कारवाई