Raju Srivastava, Sunil Pal VIDEO, Neuro Physiotherapy/ १५ दिवसांपासून दिल्लीच्या एम्समध्ये दाखल असलेल्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ताज्या अहवालानुसार, १५ दिवसांत पहिल्यांदाच त्याला शुद्ध आली आहे. एका रिपोर्टमध्ये राजूचा मेहुणा आशिष श्रीवास्तव यांच्या हवाल्याने ही माहिती शेअर करण्यात आली आहे. आशिषने कानपूरचे बिझनेस लीडर ज्ञानेश मिश्रा आणि कॉमेडियन अन्नू अवस्थी यांना याबाबत सांगितले आहे.
रिपोर्टमध्ये आशिषचा हवाला देत म्हंटले आहे की, जेव्हा हॉस्पिटलमध्ये राजूने तिथे उपस्थित नर्सेसला हातवारे करून विचारले की मी इथे कसा आलो, तेव्हा नर्सेसनी त्यांना फक्त चक्कर आल्याचे सांगितले, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. राजूचा मित्र सुनील पाल यानेही सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून मित्रांना आनंदाची बातमी दिली आहे.
व्हिडिओमध्ये तो भावूक झालेला दिसतोय आणि म्हणतोय, खुशखबर मित्रांनो, राजू भाई शुद्धीवर आले आहेत. देवाचे आभार. मी म्हणालो होतो ना चमत्कार होणार, जो हसवतो त्याला देव कधीच रडू शकत नाही आणि त्याच्या कुटुंबालाही रडवू शकत नाही. संपूर्ण कुटुंबाला, सर्व मित्रांना आणि जगभरातून प्रार्थना करणार्या लोकांना खूप सारे प्रेम. देवाचे आभार. राजू भाऊ, तुम्ही हजारो वर्षे जगा.
बुधवारीही सुनील पाल यांनी एका संवादात त्यांच्या तब्येतीची माहिती दिली होती. सुनीलने सांगितले होते की, राजूची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे. परंतु त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी किती वेळ लागेल, हे प्रार्थनांवर अवलंबून आहे. १५ दिवसांत राजू श्रीवास्तव यांचे व्हेंटिलेटर अर्ध्या तासासाठी काढण्यात आले होते. याआधी १५ ऑगस्टलाही राजूचे व्हेंटिलेटर सुमारे तासभर काढण्यात आले होते, मात्र यादरम्यान त्यांना ताप आला आणि त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले.
राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतराने सांगितले की, डॉक्टर तिच्या वडिलांवर चांगले उपचार करत आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू पण सुधारत आहे. अंतरा यांच्या म्हणण्यानुसार, राजूला दररोज ट्यूबद्वारे दूध आणि ज्यूस दिला जात आहे. त्यांच्या मेंदूमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, त्यासाठी न्यूरो फिजिओथेरपीचा अवलंब केला जात आहे.
१० ऑगस्ट रोजी जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. राजूच्या हृदयाच्या मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉकेज होते, ते अँजिओप्लास्टीद्वारे काढण्यात आले. मात्र तेव्हापासून ते सतत व्हेंटिलेटरवर आहेत. राजूचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते त्याच्या आरोग्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. राजूचा मोठा भाऊ सीपी श्रीवास्तव यांच्या गुडगाव येथील घरी सात दिवस सतत रुद्राभिषेक केला जातोय.
महत्वाच्या बातम्या-
Brain dead symptom : राजू श्रीवास्तव यांचा ब्रेन डेड झालाच कसा? ब्रेन डेड कसा होतो, त्यानंतर माणूस किती दिवस जगू शकतो?
Raju Srivastava: जिच्यासाठी १२ वर्ष थांबले तिला आता डॉक्टर जवळही येऊ देत नाही, वाचा राजू श्रीवास्तवची प्रेमकहाणी
Raju Shrivastav: अनोळखी व्यक्ती ICU मध्ये घुसल्यानंतर राजू श्रीवास्तवांच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय
Raju Srivastava: राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट, सुनील पॉल म्हणाला, सर्व काही प्रार्थनांवर..