Share

१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. १५ दिवसांपासून दिल्लीच्या एम्समध्ये दाखल असलेल्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ताज्या अहवालानुसार, १५ दिवसांत पहिल्यांदाच त्याला शुद्ध आली आहे.

राजू यांच्यावर मागील काही दिवसांपासून एम्स रुग्णालयातील उपचार केले जात आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नव्हती. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. राजू श्रीवास्तव यांना तब्बल १५ दिवसांनी शुद्ध आली आहे.

शुद्धीवर येताच फक्त चार शब्दांमध्येच त्यांनी आपल्या पत्नीशी संवाद साधला, असल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत बोलताना राजू श्रीवास्तव यांचे मित्र अशोक मिश्रा यांनी सांगितलं की, “राजू श्रीवास्तव शुद्धीवर येताच पत्नीने काही न बोलता त्यांच्याकडे पाहिलं.”

पुढे बोलताना राजू श्रीवास्तव यांचे मित्र अशोक मिश्रा यांनी म्हंटलं आहे की, “तब्बल 15 दिवसानंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर येताच पत्नीने काही न बोलता त्यांच्याकडे पाहिलं. राजू यांनी देखील अगदी कमी आवाजात हा मी ठिक आहे असं उत्तर दिलं.” राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

अशोक मिश्रा पुढे बोलताना म्हणाले की, ‘मी रात्री तीन वाजता झोपलो. मी झोपेतच असताना आशीष श्रीवास्तव यांचा मला फोन आला. ते मला म्हणाले अशोक उठ. किती झोपणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुझा भाऊ तर आता जागा झाला आहे. हे वाक्य कानी पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला.’

राजू श्रीवास्तव यांना लवकर बरं वाटावं यासाठी सर्वच जण प्रयत्न करत आहेत. राजूच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी खास पूजा ठेवली असून दिल्लीतच त्यांचा मोठा भाऊ सीपी श्रीवास्तव यांच्या घरी ही पूजा केली. पत्नी शिखापासून ते संपूर्ण कुटुंब राजू श्रीवास्तव यांना लवकर बरं वाटावं यासाठी प्रयत्न करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now