अखेर स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. राजू शेट्टी यांच्या या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
तसेच गेल्या दिवसांपासून राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारला सोडचिठ्ठी देणार असल्याचं म्हटलं जात होतं. काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत राहायचं की नाही, याचा फैसला 5 एप्रिलच्या कार्यकारीणीच्या बैठकीत करु असे म्हणत बाहेर पडण्याचे संकेत दिले होते.
शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार होते, मात्र राज्यपालांनी आक्षेप घेतल्याने त्या यादीतूनही त्यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यानंतर शेट्टी आणि ठाकरे सरकार यांच्यात खटके उडाले. त्यानंतर शेट्टी यांनी महाविकास आघाडीने दिलेले वचन पाळले नसल्याचा गंभीर आरोप केला होता.
आज अखेर राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. सोबतच शेट्टी यांनी एकला चलो रे नारा दिला. मविआचे आणि आमचे संबंध सगळे संपलेले असल्याचे यावेळी शेट्टी यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ. त्याला ही सगळी परिस्थिती सांगू, असे शेट्टी म्हणाले.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘आता राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये निराश होऊन तडफडून मरण्यापेक्षा लढता लढता मरण्याचा निर्णय घेऊयात, असे शेट्टी म्हणाले. दिल्लीवाल्यांनी फसवलं, मुंबईवाल्यांनी फसवलं. आम्हाला आता आमच्या मनगटावर न्याय मिळवून द्यायचाय, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुढे बोलताना शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष केले. महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं, असे शेट्टी यावेळी बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
जेलमध्ये टाकलं तरी मस्ती गेली नाही; टिक-टॉक स्टारचा सहकाऱ्यांसोबत धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल
VIDEO: करण जोहरने भारती-हर्षच्या मुलाला लॉन्च करण्यास दिला नकार, मग सलमानने घेतला पुढाकार
३८ पैशांच्या शेअरने एका वर्षात दिला १५ हजार टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, १ लाखाचे झाले १.५८ कोटी
इंधनदरवाढीमुळे देशामध्ये अराजक माजेल; इंधन दरवाढीवरून भाजपा खासदाराने व्यक्त केली भीती