राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji raje) यांना घालण्यात आली आहे. मात्र ही अट संभाजीराजेंना मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. ‘शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार आहे. दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार,’ असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
यावर आता मनसेची लक्षवेशी प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत याबद्दल सविस्तर प्रतिक्रिया मांडली आहे. ‘मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ?,’ असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) May 23, 2022
पुढे राजू पाटील ट्विटमध्ये म्हणतात, ‘राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे, असं त्यांनी म्हंटलं आहे.
तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी `प्लॅन बी` आखल्याची चर्चा सध्या सुरू आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला तर उद्धव ठाकरे यांनी `प्लॅन बी` आखला आहे. ठाकरेंनी सहाव्या जागेसाठी आता शिवसेनेच्या ग्रामीण भागातील नेत्याला राज्यसभेची उमेदवारी देण्याचे त्यांनी जवळपास निश्चित केले आहे.
ठाकरेंनी आखलेल्या या ‘प्लॅन बी’ मध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव आघाडीवर असल्याच समजत आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याही नावाचा यामध्ये समावेश असल्याच समजत आहे. मिलिंद नार्वेकर यांचे नाव यामध्ये असल्याच समजत आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जातात.
संभाजीराजे यांनी शिवसेनेत येण्यास अधिकृत नकार दिल्यास या नावांपैकी एक नाव हे शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी देणार येणार असल्याच बोललं जातं आहे. शिवसेनेने 12 वाजेपर्यंत संभाजीराजे यांना मुदत दिली होती. आता ही मुदत संपली आहे. संभाजीराजेंच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
LPG सबसिडी: सरकारने गॅसवर जाहीर केली २०० रुपये सबसिडी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ
‘मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण हिंदू धर्म संपला नाही’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे मोठे वक्तव्य
पत्नीपासून वेगळे होणे सहन झाले नाही, अनिल कपूर यांनी शेअर केली ही पोस्ट, म्हणाले, ४८ वर्षांत..